राज्य ग्राहक हक्क दिवसाच्या स्मरणार्थ स्पर्धा

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजीः नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार खात्याने ‘राज्य ग्राहक हक्क दिवसा’च्या स्मरणार्थ गोव्यातील विद्यार्थी, युवा आणि सामान्य लोकांना ‘सावध ग्राहक’ या विषयावर पावरपॉईंट सादरीकरण स्पर्धेत भाग घेण्याचं आवाहन केलंय.
हेही वाचाः पेडणे मतदारसंघातील नागरिकांचा विकास झाला की लोकप्रतिनिधींचा?
स्पर्धेच्या नियम आणि अटी
या स्पर्धेच्या अटी आणि नियमानुसार, नोंदणी शुल्क आकारलं जाणार नाही. प्रत्येक उमेदवार केवळ वैयक्तिक सहभागावर एक प्रविष्टी सादर करू शकतो. सहभागी स्पर्धेकाने निवासी दाखला/शाळेच्या ओळखपत्राचा वैध पुरावा जोडला पाहिजे. सहभागींनी [email protected] या ईमेल आयडीवर नोंदणी केली पाहिजे. सादरीकरण हे ५ पेक्षा जास्त स्लाइड्स आणि २० एमबीपेक्षा जास्त नसावं. सादरीकरण हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस पावरपॉईंट/ की नोट/ इतर ओपन सोर्स प्रेझेंटेशन सॉफ्टवेयरसह सुसंगत असावं. संस्थेचा निर्णय हा अंतिम असेल. स्पर्धा २५ जून २०२१ ते १५ जुलै २०२१ पर्यंत खुली असेल आणि स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र दिलं जाईल.
या आधारावर करणार स्पर्धेचं परीक्षण
स्पर्धेमधील परीक्षण हे आशयासाठी (२०%), विषयाच्या विश्लेषणासाठी (२०%), नाविन्यपूर्ण कल्पना, मौलिकता आणि सर्जनशीलता (२०%), ऑडियो/ व्हिडियोचा प्रभाव, पावरपॉईंटचा प्रभावी वापर (२०%), कला आणि विचारांची अभिव्यक्ती (१०%), वय (१०%) यानुसार केलं जाईल.
हेही वाचाः डेल्टा प्लस व्हेरिएंटविरूद्ध लढण्यासाठी राज्याच्या सीमाभागात कडक देखरेख
विजेत्यांना मिळणार आकर्षक बक्षिसं
सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रू.१०,०००, ३ द्वितीय पारितोषिके प्रत्येकी रू. ५,०००, ५ तृतीय पारितोषिके प्रत्येकी रू. ३,०००, १० चौथी पारितोषिके प्रत्येकी रू. १,००० या प्रकारे देण्यात येतील, असं माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे कळवण्यात आलंय.