प्रदेश काँग्रेसची जम्बो समिती जाहीर

दहा उपाध्यक्ष, १९ सरचिटणीसांचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी एक वरिष्ठ उपाध्यक्ष, १० उपाध्यक्ष, १९ सरचिटणीस, ३४ सचिव, २१ कार्यकारी सदस्य, १९ कायम निमंत्रित आणि ३ अतिरिक्त प्रवक्ते अशा एकूण १०७ जणांचा समावेश असलेल्या गोवा प्रदेश काँग्रेस समितीला मंजुरी दिली.

काँग्रेसने नवी समिती जाहीर केली

विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रदेश काँग्रेस समितीची पुनर्रचना करण्यात येणार असल्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी या आधीच जाहीर केले होते. मध्यंतरीच्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर काँग्रेसचे काही नेते इतर पक्षांत गेले होते. त्यांना वगळून काँग्रेसने नवी समिती जाहीर केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी गिरीश चोडणकर, तर कार्याध्यक्षपदी आमदार आलेक्स रेजिनाल्ड व आलेक्स सिक्वेरा आहेत. तर पूर्वीच्या सात प्रवक्त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. समितीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी एम. के. शेख यांची नेमणूक केली आहे. उपाध्यक्षपदी आल्तिन गोम्स, धर्मा चोडणकर, प्रमोद साळगावकर, शंभूभाऊ बांदेकर, संगीता परब, संकल्प आमोणकर, गुरुदास नाटेकर, आग्नेल फर्नांडिस, बाबी बागकर आणि विठोबा देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

२१ जणांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड

सरचिटणीस म्हणून सुभाष फळदेसाई, जनार्दन भंडारी, युरी आलेमाव, आंतोनिया सोझा, सुनील कवठणकर, सुधीर कांदोळकर, रुडॉल्फ फर्नांडिस, खेमलो सावंत आदी ३१ जणांना नेमण्यात आले आहे. सचिवपदी मोहन धोंड, दिलीप धारगळकर, गोविंद फळदेसाई, इवर्सन वारीस, शेख शब्बीर, रजनीकांत नाईक, धर्मेश सगलानी, जॉन डिकॉस्ता, महादेव देसाई, सुदिन नाईक, नीळकंठ गावस, राजन घाटे यांच्यासह ३४ जणांची, तर उदय साळकर, एड्विन बार्रेटो, रफीक शेख, अँथोनी मिनेझिस, तुळशीदास शिरोडकर यांच्यासह २१ जणांची कार्यकारी सदस्य म्हणून नेमणूक झाली आहे.

कायम आमंत्रितांत माजी मंत्री मिकी पाशेको, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, टोनी रॉड्रिग्स, बेंजामिन डिसिल्वा, राजेश फळदेसाई, समील वळवईकर, बाळकृष्ण होडारकर, अमित पाटकर यांचा समावेश आहे. तर राखी नाईक प्रभुदेसाई, ऑलेन्सियो सिमोईश व तन्वीर खतीब यांची अतिरिक्त प्रवक्ते म्हणून नेमणूक झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!