‘कायद्यांमध्ये दुरुस्ती करून खाणी सुरू करा’

खाण अवलंबितांना १५ हजारांचा भत्ता देण्याची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : सर्वोच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालाची वाट न पहाता कायदा दुरुस्ती करून तीन महिन्यांच्या आत राज्यातील खाणी सुरू करा, अशी मागणी गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने केली आहे. खाण अवलंबितांच्या कुटुंबियांना दरमहिना १५ हजार रुपयांचा भत्ता देण्याची मागणीही फ्रंटने केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटने पत्र लिहून या मागण्या केल्या आहेत. खाणी सुरू करण्याला अडथळा आणणाऱ्या गोवा फाउंडेशनसारख्या एनजीओंवर कारवाई करा. उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेणाऱ्या गोवा फाउंडेशनसारख्या एनजीओवर मोर्चा नेण्याचा इशाराही फ्रंटचे संघटक पुती गावकर यांनी दिला आहे.

हेही वाचा – MINING | Special Report | संपूर्ण खाणबंदीला तीन वर्षे पूर्ण

हेही वाचा – लॉकडाऊनच्या अफवांना बळी पडू नका : मुख्यमंत्री

court-hammer 800X450

खाणबंदी आदेशाचा फेरविचार करावा, अशी मागणी करणारी फेरविचार याचिका गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ती सुनावणीला यायची आहे. याचिकेवरील निवाड्याची वाट न पहाता केंद्र सरकारने कायदा दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू करावी. गोवा मायनिंग कन्सेशन ऍबोलीशन कायदा १९८७ पासून लागू केला तर राज्यातील लीज २०३७ पर्यंत रहातील. हा कायदा १९८७ पासून लागू होईल, अशी दुरुस्ती केंद्राने करावी. ट्रकचालक, ट्रकांचे मालक, कामगार, तसेच अन्य खाण अवलंबितांसमोर सध्या अर्थिक संकट आहे. ते दूर करण्यासाठी सरकारने प्रतिमहिना १५ हजारांचा भत्ता द्यावा, अशी मागणी आहे.

हेही वाचा – सिलिंडर पुन्हा एकदा २५ रुपयांनी महागला, किंमत ८००च्या पार

हेही वाचा – चोर्ला घाटातील लुटारू अखेर गजाआड

गोवा फाऊंडेशनवर मोर्चा नेणार

राज्यातील खाण बंदीला गोवा फाऊंडेशन ही एनजीओ कारणीभूत आहे. या एनजीओच्या अार्थिक स्रोतांची चौकशी झाली पाहिजे. या एनजीओचो काळ्या यादीत समावेश करावा. ही एनजीओ खाणी सुरू होण्यात अडथळा आणत आहे. खाणी सुरू झाल्या नाहीत तर या एनजीओच्या कार्यालयावर मोर्चा नेण्याला आम्ही कमी करणार नाही, असा इशाराही पुती गावकर यांनी दिला.

हेही वाचा – भाईंचा वारसा पुढे नेऊ शकेन याची मला खात्री- मुख्यमंत्री

हेही वाचा – राज्याची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर? जीएमसीत गरोदर महिलेची क्रूर चेष्टा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!