शनिवारी रुग्णसंख्या दीडशेच्या पार! अशातच 10वीच्या परीक्षेचं वेळापत्रकही आलं

१३ मेपासून SSCच्या परीक्षांना सुरुवात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा बोर्डाकडून दहावीच्या परीक्षांची घोषणा करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीनं राज्यातील दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. १३ मे पासून राज्यातीला दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाणार आहे. महत्त्वाचे पेपर्स १९ मे पासून सुरु होणार आहेत.

राज्यातील एकूण ३१ परीक्षा केंद्रांवर दहावीच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. ज्या हरमल आणि नेत्रावळीतील दोन नव्या परीक्षा केंद्रांचाही समावेश आहे. दहावीचे तब्बल २५ हजार २५८ विद्यार्थी यंदा परीक्षेला बसणार आहेत. यात एकूण १३ हजार ८११ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर ११ हजार ४३७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील दहावीच्या परीक्षा घेताना एसओपींचं पालन करणं बंधनकारक असणार आहेत.

महामारीमध्ये दहावीच्या परीक्षा नेमक्या केव्हा होणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचंही लक्ष लागलं होतं. अखेर या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दहावीआधीच बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचही वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा घेणं योग्य आहे का, असाही सवाल उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा – महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

शनिवारी दीडशेपेक्षा जास्त रुग्ण

दुसरीकडे राज्यात कोरोना रुग्णवाढीनं नवा विक्रम शनिवारी केलाय. शनिवारी तब्बल दीडशेपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. पणजी, मडगावात रुग्णवाढीनं आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढवली आहे. अशातच शनिवारी १५७ नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर सक्रिय रुग्णांची संख्यादेखील १ हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. या सगळ्या दिलासादायक बाब म्हणजे शनिवारी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मात्र सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्यानं चिंता व्यक्त केली जाते आहे.

हेही पाहा – Exams | HSC | बारावी बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रकर जारी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!