बघाच! सत्तरी तालुक्याचं भूषण असलेल्या बर्वेबुवांची खास मुलाखत

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : आपल्या गोव्यात एकापेक्षा एक जबरदस्त अशी माणसं आहे. त्यात सत्तरी तालुक्याचा नंबर पहिला लागतो, असं म्हणायलाही वाव आहेच. आपल्या सत्तरी तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ. प.नारायण बुवा बर्वे त्यापैकीच एक. त्यांनी आजपर्यंत ४ हजार १५७ कीर्तने गोवा आणि विविध राज्यात सादर केली आहेत.हा एक विक्रमच आहे.त्यांना दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी कीर्तनाबरोबरच आपल्या जीवनात असंख्य सामाजिक उपक्रम राबविले. तरुण पिढीसाठी ते आदर्श आहेत.
त्यांना पंच्याहत्त्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांच्या जीवनाचा रौप्य महोत्सव येत्या १० जानेवारी २०२१ रोजी सकाळी ९ ते साडेपाच ह्या वेळेत नानोडा बांबर सत्तरी येथील त्यांच्या निवासस्थानी बर्वे बुवा शिष्य संप्रदाय आणि त्यांचे मित्रमंडळ व हितचिंतकांनी साजरा करण्याचे सुनिश्चित केले आहे.आणि या निमित्ताने त्यांच्याशी अँड शिवाजी देसाई यांनी संवाद साधला.ह्या मुलाखतीचे चित्रीकरण विजय नाईक यांनी केले आहे. तसंच मुलाखतीची संकल्पना अँड शिवाजी देसाई यांची आहे. जरूर पाहा ही मुलाखत..