स्पेशल टास्क फोर्समध्ये ‘या’ व्यक्तींचा समावेश

कोविड-19च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी स्पेशल टास्क फोर्सची यादी जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड-19 महामारीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी गोवा सरकारने शुक्रवारी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा केली. या स्पेशल टास्कमध्ये असलेल्या सदस्यांची नाव शनिवारी जाहीर करण्यात आलीयेत.

हेही वाचाः लसीकरणाची सुव्यवस्थित रणनीती तयार करा

अध्यक्षपदी मुख्यमंत्री, तर उपाध्यक्षपदी आरोग्यमंत्री

कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एक स्पेशल टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तर उपाध्यक्षपदी आरोग्यमंत्री विश्वजित राणे काम पाहणार आहेत. 15 सदस्यांच्या या टास्क फोर्समध्ये सरकार आणि खासगी क्षेत्रातील डॉक्टरांचाही समावेश आहे. या समितीत इतर सदस्यांमध्ये आयएएस परिमल राय (मुख्य सचिव), आयएएस संजय कुमार (महसूल सचिव), आयएएस रवी धनव (आरोग्य सचिव), जोस डिसा (आरोग्य सेवा संचालक), डॉ. शिवानंद बांदेकर (गोवा मेडिकल कॉलेज डीन), डॉ. एम. पी. सिल्वेरा (गोवा मेडिकल कॉलेज पिडियाट्रिक विभाग प्रमुख), डॉ. उत्कर्ष बेतोडकर (आरोग्य सेवा संचालनालय स्टेट एपिडेमियोलॉजिस्ट), डॉ. इरा आल्मेदा (उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटल वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ), डॉ. विनायक बुवाजी (आयएमए-गोवा चॅप्टरचे अध्यक्ष), डॉ. नारायण एस. उसगांवकर (वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ), डॉ. शेखर साळकर, डॉ. शिवानंद गांवस (सीआयएपी कार्यकारी सदस्य) यांचा समावेश आहे.

डॉ. बांदेकरांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टरांची आणखी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली जाईल. ही तज्ज्ञांची समिती आवश्यकतेनुसार उपचार प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेईल. तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होणार असल्याने दोन्ही समित्यांमध्ये बालरोगतज्ज्ञ असतील, असं मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

मुलांसाठी 60 खाटांचं विशेष आयसीयू

गोवा मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकमध्ये मुलांसाठी 60 खाटांचं विशेष अतिदक्षता युनिट (आयसीयू) स्थापन करण्याचा निर्णयही गोवा सरकारने घेतला आहे. खासगी बालरोगतज्ज्ञ आणि सेवांमधून निवृत्त झालेल्यांना सेवा देण्यासाठी आयसीयू घेतले जाईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!