सभापतींकडून साळ ग्रामपंचायतीत ‘सॅनिटायझर स्प्रे पंप’चं वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोलीः सभापती आणि डिचोली मतदार संघाचे आमदार राजेश पाटणेकर यांनी डिचोली तालुक्यातील साळ ग्रामपंचायतीला ‘सॅनिटायझर स्प्रे पंप’ भेट स्वरूपात दिलेत. सभापतींनी दिलेली ही भेट उपसरपंच वर्षा साळकर आणि पंच बिंदिया राऊत यांनी स्वीकारली.
हेही वाचाः बारावी परीक्षांचा केंद्राचा निर्णय दोन दिवसात
पंचसदस्य, भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वितरण
देशात नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने साळ ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हा ‘सॅनिटायझर स्प्रे पंप’ सभापतींकडून वितरीत करण्यात आला. यावेळी पंच प्रकाश राऊत, पंच बिंदिया राऊत, तमर नाईक महिला मंडळ – खोलपेच्या अध्यक्ष आणि भाजप कार्यकर्त्या सपना शिरोडकर, भाजप कार्यकर्ते मोहन राऊत, गोपी राऊत, तसंच सचिव पुंडलिक गावस, सहसचिव शांबा घुरे, आनंद राऊत, सर्वेश चांदेलकर आदी उपस्थित होते.
हेही वाचाः तब्बल 1 कोटी नोकऱ्या गेल्या…97 टक्के कुटुंबांचं उत्पन्न घटलं !
प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं
सभापती राजेश पाटणेकर यांनी साळ ग्रामपंचायतीतील कर्मचारी आणि पंचमंडळी गावात कोविड काळात चांगली सेवा देत आहे. नागरिकही आपापली कार्यालयीन कामं करून घेत आले आहेत. तरीही कोविड काळात प्रत्येकाने आपापली काळजी घेणं महत्त्वाचं आहे, असं सभापती बोलताना म्हणाले.
हेही वाचाः आशियाई बॉक्सिंग स्पर्धा; संजीतचा गोल्डन पंच!
यावेळी पंच प्रकाश राऊत यांनी साळवासीयांना आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना कोविड – 19 नियमावलीचं पालन करून सॅनिटायझर स्प्रे पंप योग्य प्रकारे हाताळण्याचं आवाहन केलं.