प्लास्टर ऑफ परिसची मूर्ती, विसर्जन मिरवणुकांवर बंदी

पणजी महानगरपालिकेकडून चतुर्थीसाठी मार्गदर्शक तत्त्वे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: प्लास्टर ऑफ परिसची मूर्ती आणि विसर्जन मिरवणुका यांवर बंदीसह चतुर्थीसाठी महापालिकेने खास मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जारी केली आहेत. त्यामुळे यंदाची चतुर्थी ही कोविड नियमावलीचं पालन करून साजरी करावी लागणार आहे.

हेही वाचाः बाधिताचा ३० दिवसांत मृत्यू झाल्यास ठरणार करोनाबळी

विसर्जनस्थळी फटाके फोडण्यावरही बंदी

विसर्जनस्थळी फटाके फोडण्यावरही बंदी असेल. गर्दी टाळण्यासाठी मूर्तीचं विसर्जन झाल्यानंतर त्वरित घरी परतावं लागेल. करोनाबाधित मिळण्याचं प्रमाण कमी असलं तरी करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. चतुर्थीनंतर करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे धोका वाढण्याची शक्यता आहे. धोका टाळण्यासाठीच महापालिकेने चतुर्थीसाठी खास एसओपी जारी केली आहे. महापौर रोहित मॉन्सेरात यांनी याविषयीची माहिती दिली.

विसर्जन संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेतच

मूर्ती घरी नेताना कुटुंबातील दोघांनीच जावं. सामाजिक अंतराचं पालन आवश्यक आहे. उत्सवात वावरताना मारक परिधान करणं बंधनकारक आहे. विसर्जन संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत करण्याची मुभा आहे. विसर्जन मिरवणुकांना बंदी आहे. निर्माल्य कचरापेटीत टाकावा. विसर्जनस्थळी प्रत्येक कुटुंबातील दोन किंवा तिघांनीच यावं, असं एसओपीत म्हटलं आहे.

निश्चित जागीच ८ ते १० सप्टेंबरपर्यंत माटोळी साहित्याची विक्री

चतुर्थी काळात मार्केट आणि मांडवी किनारी माटोळीच्या सामानाची विक्री होत होती. आता निश्चित केलेल्या जागीच ८ ते १० सप्टेंबरपर्यंत माटोळी साहित्याची विक्री करता येईल. महापालिकेच्या परवानगीशिवाय फटाक्यांची विक्री करता येणार नाही. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने काही ठिकाणं निश्चित केली आहेत.

हेही वाचाः करोना, पावसाचा व्यापाऱ्यांना फटका

विसर्जनासाठीची स्थळे

फेरी धक्का, मिरामार किनारा, करंजाळे किनारा (मार्टिन्स), करंजाळे किनारा (स्वीमसी), रायबंदर फेरी धक्का, कॅप्टन ऑफ पोर्ट जेटी, मानसवाडा रायबंदर, फोंडवे रायबंदर, सांपेंद्र रायबंदर, फोर पिलार मळा, जुने पीडब्ल्यूडी कार्यालय पाटो.

हा व्हिडिओ पहाः Teacher`s Demand Regularization | पार्ट टाईम शिक्षकांच्या आश्वासनपूर्तीचं काय?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!