श्री दामोदर सप्ताह समिती अध्यक्षपदी सोनुर्लेकर

उपाध्यक्षपदी शेखर खडपकर यांची निवड

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को : श्री दामोदर भजनी सप्ताह समितीच्या अध्यक्षपदी कृष्णा सोनुर्लेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच शेखर खडपकर (उपाध्यक्ष), संतोष खोर्जुवेकर (चिटणीस), विष्णू गारोडी (खजिनदार) यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.

हेही वाचा:सत्तरीतील सरपंच, पंच धास्तावले, ‘हे’ आहे कारण…

मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

उद्योजक प्रशांत जोशी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सकाळी दामोदर मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. कोविडमुळे गेले दोन वर्षे वास्को सप्ताह व काही मर्यादा आल्याने सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व वास्को सप्ताह फेरीविना साजरा करण्यात आला होता. त्यामुळे यंदा फेरीसह मोठ्या उत्साहात वास्को सप्ताह साजरा करण्याची सूचना बहुतेकजणांनी केली.

हेही वाचा:ओबीसी समाज घटकांत अस्वस्थता…

कोविड रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रतिबंध येण्याची शक्यता

जोशी म्हणाले, यंदा परिस्थिती सुधारत असल्याने गोव्यात काही ठिकाणे उत्सव साजरे झाले आहेत. त्यामुळे आमचीही इच्छा आहे की, यंदा वास्को सप्ताहही उत्साहात साजरा करावा. यासंबंधी गेल्या आठवड्यात आम्ही बैठक घेतली. त्यावेळी गेल्या महिन्यापासून कोविड रुग्ण संख्या वाढू लागल्याबद्दल चर्चा करण्यात आली. त्यानंतर आम्ही उपजिल्हाधिकारीची भेट घेतली असता त्यांनी सांगितले की परिस्थिती बदलली आहे, रुग्णसंख्या वाढू लागल्याने काही प्रतिबंध येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:पक्ष मजबूत करण्यासाठी आप नेत्यांची बैठक…

दिंडीसाठी दोन प्लॅन तयार

त्यावेळी आम्ही त्यांना सांगितले की, तुम्ही नवीन मार्गदर्शक तत्त्वाबद्दल सांगा, मार्गदर्शन करा. त्यानुसार आम्ही कोविड मार्गदर्शक तत्त्वाची अंमलबजावणी करू. गरज भासली तर आम्ही मुख्यमंत्री, मुख्य सचिव आदींना भेटून आमची बाजू मांडू. त्यातून त्यांनी मार्ग काढला तर त्यांच्या सूचनेनुसार सप्ताह साजरा करू. आम्ही दिंडीसाठी दोन प्लॅन तयार केले असून परिस्थितीनुसार कोणता प्लॅन अमलात आणावा यासंबंधी ठरविले जाईल.

हेही वाचा:सेवेत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, सरकारला इशारा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!