आय.एफ.बी कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवा…

आमदार विरेश बोरकरांची निवेदनाद्वारे कामगारमंत्री तसेच कामगार आयूक्तांकडे मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेर्णा : आय.एफ.बी. कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना भेडसावणाऱ्या समस्यांसंदर्भात रेव्होलुशनरी गोवन्सचे सांत आद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी बुधवारी कामगार आयुक्त तसेच कामगार मंत्री यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगार आयुक्त तसेच कामगार मंत्र्यांना निवेदन सादर केले.
हेही वाचाःShraddha Walkar Murder Case : अफताबच्या नार्को चाचणीला परवानगी…

निवेदनाद्वारे मागणी

कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्यांचे गांभीर्य, त्यांना होणारा त्रास, समस्या सोडविण्याबाबत कंपनी मँनेजमेंटची उदासीनता या गोष्टी विरेश बोरकर यांनी कामगार आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिल्या. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या नोकरीची सुरक्षितता व कामावर परत रुजू झाल्यावर सतवणुक होता कामा नये अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
हेही वाचाःGoa Ration Scam : बेळगावातील मिलला पुरवला ४० टन गहू…

आयुष्य उद्ध्वस्त होणार

पत्रकारांशी बोलताना बोरकर म्हणाले की, राज्यातील अशा अनेक कंपन्यांध्ये कंत्राटी कामगारांची सतवणुक सुरु आहे, त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही. त्यांच्या नोकरीची सुरक्षितता नाही. आज आय.एफ.बी कंपनीत काम करणारे कामगार हे ३०-३२ वयोगटातील असून, संसाराची स्वप्ने पाहाण्याच्या वयात जर त्यांना नोकरीमधून काडून टाकले तर त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होणार. त्यांच्या नोकरीवर अवलंबून असणाऱ्या त्यांच्या कुटुंबाचे पुढे काय होईल याचा विचार राज्य सरकारने करावा असेही ते म्हणाले.
हेही वाचाःकाणकोणच्या अध्यात्मिक पर्यटन प्रकल्पास पूर्ण सहकार्य करणार…

तरुण पिढीच्या आयुष्याशी सरकार खेळतंय

सरकारने आजतागायत कधीच कामगारांच्या समस्यांकडे गंभीरतेने पाहिले नाही. राज्यात मोठमोठी जॉब फेअर ची स्टंटबाजी केली जाते. परंतु प्रत्यक्षात त्याचा परप्रांतियांना सोडून कोणालाच लाभ होताना दिसत नाही. जॉब फेअर चा स्टंट हा केवळ गोवेकरांची दिशाभूल करण्यासाठी असून, तरुण पिढीच्या आयुष्याशी आज सरकार खेळत असल्याची टीका बोरकर यांनी केली.
हेही वाचाःधान्याचा ताळेबंद योग्य; चौकशीची गरज नाही!

कामगारांच्या समस्या सोडविण्यात सरकार उदासीन

आय.एफ.बी मधील कामगार ज्यांच्यावर आज अन्याय होत आहे त्यांच्याबरोबर आज सरकारने तसेच कामगार आयुक्तांनी उभे राहायला पाहिजे होते, परंतु तसे करताना दिसत नाही. कामगारांच्या समस्या सोडविण्यात सरकारची उदासीनता दिसून येते, त्याचबरोबर सरकार अकार्यक्षम असल्याचेही इथे सिद्ध होत असल्याचे बोरकर म्हणाले.
हेही वाचाःNational Press Day : राजधानी पणजीत पत्रकार भवन उभारण्याचा विचार…

कंपन्यांच्या मनमानीला आळा घातला पाहिजे

पुढे बोलताना बोरकर म्हणाले की, राज्यातील अनेक कंपन्यांमध्ये कामगार वर्ग तणावात गेला आहे. एक तर काम कर, नाहीतर काम सोड अशा पद्धतीची मनमानी कंपन्यांची सुरू आहे. ह्याला कुठे ना कुठे तरी आळा घातला पाहिजे. कामगार पॉलिसी मध्ये दुरुस्ती केली पाहिजे. आय.एफ.बी कंपनी सहित इतर कंपनीच्या कामगारांच्या समस्यावर लवकरात लवकर मार्ग काडून त्यांना दिलासा देण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. आज जरी कामगार मंत्र्यांकडून ह्या कामगारांच्या विषयावर सकारात्मक उत्तर मिळाले नाही, परंतु पुढे राज्यातील कामगारांबद्दल चा विषय आम्ही येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याचे बोरकर यांनी सांगितले.
हेही वाचाःएकाच वाहनाला दोन नंबरप्लेट, नक्की काय आहे हा प्रकार? वाचा सविस्तर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!