जनसेवा हीच नारायण सेवा: सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य

विविध गावांमध्ये घेतल्या पूरग्रस्तांच्या भेटी; श्रीदत्त पद्मनाभ पीठातर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

Goan Varta Live | प्रतिनिधी

कुंडई: भगवंताला सर्वत्र पाहण्याची दृष्टी ठेवा. संकटामध्ये सापडलेल्यांना मदत करणं हीच भगवत सेवा आहे. गोव्यामध्ये अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी मोठी हानी झाली आहे. या लोकांना अन्न, वस्त्र, धन किंवा अन्य माध्यमातून आपआपल्या परीने जी सेवा करता येईल ती केली पाहिजे. मनुष्याला समोरच्या व्यक्तीत ईश्वर पाहण्याची आवश्यकता आहे आणि हीच मनुष्याची श्रेष्ठता आहे. जनसेवा हीच नारायण सेवा आहे. आजच्या या काळात आपण जर अशी मदत केली तर भगवान निश्चितच आपल्यावर प्रसन्न होईल, असं श्री दत्त पद्मनाभ पीठ, पीठाधीश्वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी केलं.

हेही वाचाः काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव आज गोव्यात

स्वहस्ते मदत करा

आपण कोणत्याही स्थितीत असो ईश्वर प्रत्येकांमध्ये पाहण्याची आवश्यकता आहे. चतुष्पाद, द्विपाद असो ज्यांना आपण मदत करू शकता त्यांना अवश्य मदत करा. मनापासून मी आपल्या देशबांधवाला मदत करीत आहे ही माझी देशाप्रति असलेली निष्ठा आहे आणि ही निष्ठा मला या सेवेच्या माध्यमातून दाखवून द्यायची आहे. आज अशा सेवावृत्तीची गरज आहे ज्यानं आपलं ध्येय आपण गाठू शकू. अतिवृष्टीमुळे ज्यांची परिस्थिती बिकट झाली आहे त्यांना आपण स्वहस्ते मदत करा, असं आवाहनपर उद्बोधन स्वामीजींनी केलं.

गोवा राज्यात मुसळधार पावसामुळे मागील आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीत बहुतांश नद्यांना पूर आल्यानं परिस्थितीही धोकादायक बनली. अनेक घरांत पाणी शिरलं, तर मोठ्या प्रमाणात घरं कोसळून गेली आणि जनतेचंही नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. अशावेळी १ ऑगस्ट रोजी सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या पावन उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली श्री दत्त पद्मनाभ पीठ, श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाद्वारे राज्यातील विविध गावांत अन्नधान्य दान करण्यात आले, तर निर्माण झालेल्या परिस्थितीची केली. याप्रसंगी पूज्य स्वामीजींनी संबोधन केलं.

हेही वाचाः नाव बदलावंच लागलं! भूमीपुत्र नाव वगळणार, आता भूमी अधिकारिणी विधेयक

पूरग्रस्तांना आधार देणं काळाची गरज: संजय कळंगुटकर

गोव्यात अतिवृष्टीमुळे विविध गावांतील जनतेला नुकसान झालं. पूज्य सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींच्या दिव्य मार्गदर्शनाने श्री दत्त पद्मनाभ पीठ देव, देश आणि धर्माचे कार्य करताना सामाजिक बांधिलकी जपत आज राज्यात गावोगावी भेटी देत निर्माण झालेल्या स्थितीची पाहणी करुन आपद्ग्रस्थांना जीवनावश्यक अन्नधान्य देण्यात आलं. अशा यावेळी बिकट परिस्थितीत पूरग्रस्तांना आधार देणं काळाची गरज आहे, असं प्रतिपादन सामाजिक विभागाध्यक्ष संजय कळंगुटकर यांनी केलं.

हेही वाचाः रिव्होल्यूशनरी गोवन्सतर्फे खाजन पाळीतील पूरग्रस्तांना मदत

पूरग्रस्त भागांना दिली भेट

या अभियान दरम्यान पाळी-वेळगे-भामई, केरी-सत्तरी, साखळी, होंडा, वाळपई, खेतोडे तसंच उसगांव पंचायत भागातील गावांना भेटी देण्यात आल्या. याप्रसंगी श्री दत्त पद्मनाभ पीठाचे संचालक मंडळ – अँड ब्राह्मीदेवीजी, रामा टेमकर, श्रीराज शेलार, गजेश मांद्रेकर, सुवर्णलता वायंगणकर, सामाजिक विभाग पदाधिकारी – सिद्धार्थ रेवोडकर, राजेश दळवी, वासुदेव गावस, विनोद नाईक, रुपेश भामईकर, क्षेत्रीय प्रमुख तसंच युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः Video | Accident | Fishing | समुद्र खवळलेला, मच्छिमारांनो काळजी घ्या!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!