नारायण दत्ता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला

शनिवारी दुपारची घटना; उपचारासाठी नाईक जीएमसीत दाखल

श्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. शनिवारी दुपारी असाच एक भयंकर प्रकार घडलाय. सामाजिक आणि आरटीआय कार्यकर्ते नारायण दत्ता नाईक यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. या हल्ल्यात नाईक गंभीर जखमी झालेत. जखमी अवस्थेतील नारायण नाईक यांचे काही फोटोज समोर आलेत.

नक्की काय झालं?

हा भयंकर प्रकार शनिवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडलाय. नारायण दत्ता नाईक हे कामानिमित्त सांकवाळ पंचायतीत गेले असता त्यांच्यावर हल्ला झालाय. सांकवाळ पंचायतीच्या इमारतीत हा प्रकार घडलाय. गाडीतून उतरताना दोघांनी नाईकांवर हल्ला केला.

कोणी केला हल्ला?

नाईकांवर हल्ला करणारे हल्लेखोर हे पाऊस नसतानाही रेनकोट घालून आले होते. त्यांनी चेहरा पूर्ण झाकला होता. त्यामुळे हल्ला नक्की कुणी केला हे समजलं नाही. हल्लेखोरांनी लोखंडी सळी तसं पाईपने नाईकांवर हल्ला केला. यावेळी नाईकांच्या डोक्यावर वार केल्याने ते जखमी झालेत. तसंच उजव्या पायावर सळीने वार केलाय.

नाईक जीएमसीत दाखल

हल्लेखोर हल्ला करून पळून गेल्यावर तिथे उपस्थित असल्यांनी धावपळ करत नाईकांना तातडीने उपचारासाठी बांबोळीतील जीएमसीत आणलंय. जीएमसीत त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आलेत. त्यांच्या तब्येतीविषयी अजून माहिती मिळालेली नाही.

हल्ल्यामागचं कारण काय?

नाईकांवर झालेल्या हल्ल्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र सांकवाळ कोमुनिदादशी संबंधीत वेगवेगळे विषय तसंच या परिसरात कोमुनिदाद जमिनीवर झालेली अतिक्रमणे आणि बड्या बिल्डरांकडून झालेल्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश करण्यात नारायण नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आरटीआयच्या माध्यमाने त्यांनी अनेक भानगडी उघड केल्या आहेत. तसंच त्यांच्या अनेक तक्रारी सरकार दरबारी प्रलंबित आहेत. त्यामुळे या सगळ्यातून त्यांच्यावर हल्ला झाला असल्याची शक्यता सध्या बोलून दाखवली जातेय. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं असून ते यासंबंधी अधित तपास करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!