मंत्री मॉन्सेरात म्हणतात….

स्मार्ट सिटीच्या कामावर मंत्री बाबूश मॉन्सेरातांचे वक्तव्य

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

मागिल काही दिवसांपासून राजधानी पणजीत स्मार्ट सिटीची काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यावर खोदकाम करण्यात आलंय. या कारणास्तव वाहतूक कोंडीची मोठी समस्या ऐरणीवर आलीए. दरम्यान पावसाळा तोंडावर येऊन ठेपलाय. त्यामुळे स्मार्ट सिटीचे काम पूर्ण न झाल्यास नागरीकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. स्मार्ट सिटीचे काम संथ गतीने सुरू आहे. कामे अशीच रखडल्यास पणजीत पाणी तुंबणार असल्याच्या संभावना व्यक्त केल्या जात आहे. मात्र या संदर्भात पणजीचे आमदार आणि महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

काय म्हणाले मंत्री बाबूश मोन्सेरात?
पणजीत सुरू असलेली स्मार्ट सिटीची कामे येत्या 30 मे पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी म्हटले आहे. तसेच, उत्तर गोव्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटीच्या कंत्राटदाराला त्याबाबत नोटीस देखील बजावली असल्याची मोन्सेरात म्हणाले.

विशेष व्यक्तींना अडथळा महानगरपालिकेची जबाबदारी – फळदेसाई
पणजीतील स्मार्ट सिटी कामाचा सामान्य नागरिकांना त्रास होत असताना विशेष व्यक्तींना देखील त्याचा अत्यंत त्रास होणार यात शंका नाही. मात्र या कामामुळे विशेष व्यक्तींना अडथळा होत असल्यास त्यांनी तशी तक्रार करावी असा सल्ला समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिला आहे.

तसेच. स्मार्ट सिटीच्या कामाचा विशेष व्यक्तींना अडथळा निर्माण होत असल्यास ती संपूर्णपणे महानगरपालिकेची जबाबदारी आहे. असेही मंत्री फळदेसाई म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!