शिरदोन सरपंचांवरील अविश्वास प्रकरणी संचालकांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

उच्च न्यायलयाचं स्पष्टीकरण; 26 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

जुने गोवा: शिरदोनचे सरपंच जगदीश गावस यांच्याविरोधात ४ विरुद्ध ० मतांनी संमत झालेला अविश्वास ठराव बेकायदा ठरविण्याची अतिरिक्त पंचायत संचालकांच्या आदेशाला उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली. नव्या सरपंचांची निवड होईपर्यंत या पदाचा ताबा उपसरपंचांकडे राहील असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. अंतिम सुनावणी २६ ऑगस्ट रोजी होणार आहे.

हेही वाचाः पोलिसांकडून 1.23 कोटींच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

हे प्रथमदर्शनी पंचायत पातळीवरील लोकशाहीला धोकादायक

अविश्वास ठराव संमत होऊनही पदाला चिकटून राहण्यास वाव देऊन लोकशाही पद्धत डावलण्यात आल्याचं निरीक्षण न्या. महेश सोनक यांनी नोंदवताना, अतिरिक्त पंचायत संचालकांवर ठपका ठेवला. गावस यांनी बहुमताचा विश्वास गमावला असतानाही, त्यांना सरपंचपदी राहण्यास सहाय्यभूत ठरणं हे प्रथमदर्शनी पंचायत पातळीवरील लोकशाहीला धोकादायक आहे, असं उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

पंचायतीच्या बैठकीचं इतिवृत्त एका वहीत लिहिल्यामुळे ते वैध नाही

पंचायतीच्या बैठकीचं इतिवृत्त एका वहीत लिहिल्यामुळे ते वैध नाही, असं अतिरिक्त पंचायत संचालकांनी आदेशात म्हटलं असलं, तरी ज्या परिस्थितीत हे इतिवृत्त लिहिलं गेलं ते गैर ठरत नाही, नंतर ते कधीही अधिकृत वहीत लिहू जाऊ शकतं, असं न्यायालयाने म्हटलं आहे. उपसरपंच उपस्थित असताना बैठकीच्या अध्यक्षस्थानी एका पंच सदस्याने बसावं हे नियमबाह्य आहे, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Shocking Accident | CCTV | ….म्हणून रस्ता ओलांडताना नेहमी सतर्क राहावं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!