आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ता तांबडी सुर्लात गायन मैफल

संस्कृती मंत्रालय भारत सरकार, भारतीय पुरातत्त्वीय सर्व्हेअर, गोवा विभाग यांच्यातर्फे कार्यक्रम

Goan Varta Live | प्रतिनिधी

तांबडी सुर्लाः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महादेव मंदिर तांबडी सुर्ला येथे श्री रुपेश गावस यांचं गायन संपन्न झालं. नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमीतर्फे सदर कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. संस्कृती मंत्रालय भारत सरकार, भारतीय पुरातत्त्वीय सर्व्हेअर, गोवा विभाग यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

राग ‘तोडी’ने मैफिलीची सुरुवात

राग ‘तोडी’ने गावस यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘हर हर शिव शंकर’ या पारंपरिक बंदिशीने सुरुवात करून नंतर ‘मेघ’ रागातील पंडित ज्ञानप्रकाश घोष यांची ‘घन छाये गगन अत घोर घोर’ ही मध्य लय त्रितालमधील बंदिश सादर केली.

हेही वाचाः Fire | Video | पिसुर्लेजवळ ट्रान्सफॉर्मला आग, पण वीज कर्मचारी नॉट रिचेबल

सर्वात्मका सर्वेश्वरा गीताने मैफिलीची सांगता

कार्यक्रमाची सांगता पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली सर्वात्मका सर्वेश्वरा या ‘संगीत ययाती देवयानी’ नाटकातील नाट्यपदाने केली. सूरज मोरजकर आणि चारुदत्त गावस यांनी अनुक्रमे तबला आणि हार्मोनियम साथसंगत केली. कोविड महामारीमुळे मोजक्याच रसिकांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!