माजी उपसभापती सायमन डिसोझा यांचे निधन

काँग्रेस पक्षातर्फे दाबोळी व वास्को विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक वेळा आमदार. कोकणीसह, इंग्रजी, हिंदी व मराठीवरही होते प्रभुत्व.

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : गोवा विधानसभेचे माजी उपसभापती सायमन डिसोझा (Simon De Souza) यांचे निधन झाले. डिसोझा हे काँग्रेस पक्षातर्फे दाबोळी व वास्को विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक वेळा निवडून आले. २८ ऑक्टोबर १९३८ रोजी बेंगळुरू येथे त्यांचा जन्म झाला. १९७६ ते १९८० या काळात ते मुरगाव नगरपालिकेचे नगरसेवक होते. जानेवारी १९९० ते एप्रिल १९९० या काळात त्यांनी विधानसभेचे उपसभापती म्हणून काम पाहिले. २७ मार्च १९९१ रोजी ते पुन्हा उपसभापती म्हणून निवडले गेले. १२ डिसेंबर १९९४ पर्यंत ते या पदावर होते. कोकणीसह, इंग्रजी, हिंदी व मराठीवरही त्यांचे प्रभुत्व होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!