सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी ‘लव्ह ट्रॅन्गल’चा पोलिसांकडून शोध

प्रियकराची आज पुन्हा चौकशी होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : दिवसेंदिवस गुंतागुंतीचं बनत चाललेल्या सिद्धी नाईक मृत्यूप्रकरणाचा गुंता दिवसेंदिवस अधिकच गूढ बनत चाललाय. आता सिद्धीच्या मृत्यूप्रकरणाचा तपास पोलीस एक वेगळ्या ऍन्गलनेही करुन पाहत आहेत. सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणाला लव्ह ट्रॅन्गलचा आयाम असल्याचं समोर येऊ लागल्यामुळे पोलिसांनी आपला तपास त्यादिशेनंही सुरु केलाय. याप्रकरणी सिद्धीच्या प्रियकराची आज जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. यातून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिद्धीच्या मृत्यूबाबत चित्रविचित्र माहिती समोर येऊ लागली आहे. अशातच सिद्धीच्या कुटुंबियांनीच सिद्धीनं आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर तिच्या वडिलांनी आपले स्टेटमेन्ट सातत्यानं बदलल्यामुळे पोलिसांचाही संशय बळावला होता. त्यामुळे सिद्धीच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक वादाचे कंगोरे हळूहळू उलगडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.

सिद्धीच्या प्रियकराशी झालेलं मोबाईल कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागलंय. ते दोघंही ज्या सीम कार्ड वरुन बोलायचे ते सीम कार्डही पोलिसांनी ज्पत केलंय. दरम्यान, आणखी एका नंबरवरुन ते दोघं बोलत असावेत, असा संशय पोलिसांना आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दुसऱ्याही सीमकार्डचा शोध घेतला जातोय.

हेही वाचा – कर्फ्यू पुन्हा वाढवला! 30 ऑगस्टपर्यंत निर्बंध कायम

खळबळजनक माहिती

एकूण लव्ह ट्रॅन्गलवरुन खळबळजनक माहिती समोर येते आहे. सिद्धीच्याच ओळखीच्या एका अल्पवयीन तरुणीसोबत तिच्या प्रियकराची जवळीक निर्माण झाली होती. ही गोष्ट जेव्हा सिद्धीला समजली, तेव्हा ती प्रचंड दुखावली गेली आणि यामुळे ती मानसिक तणावाखाली आली होती. दीड महिन्यापूर्वी सिद्धीला कोरोनाची लागण झाली होती.

तेव्हापासून प्रियकर आणि सिद्धी यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. याच कालावधीत त्या अल्पवयीन तरुणीशी प्रियकराची जवळीक वाढली. यामुळेच सिद्धी निराश आणि हताश झाली होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. दरम्यान, सिद्धीच्या प्रियकराची याआधीही चौकशी करण्यात आली होती. आज होणाऱ्या चौकशीतून काय नवे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागतात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकास अटक

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!