सिद्धी नाईक मृत्यूप्रकरण | कधी, कुठे, केव्हा, काय घडलं?

सिद्धी नाईकनं आत्महत्या केली? तिची हत्या झाली? की तिला जीव देण्यासाठी कुणी भाग पाडलं? गूढ अजूनही कायम

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः सिद्धी नाईकनं आत्महत्या केली, तिची हत्या झाली की तिला जीव देण्यासाठी कुणी भाग पाडलं, याचं गूढ अजूनही कायम आहे. सिद्धी नाईक मृत्यूप्रकरण राज्यात अनेक प्रश्न उपस्थित करणारं प्रकरण ठरतंय. अशात नेमकं कधी कुठे काय घडलंय, वाचा थोडक्यात…

हेही वाचाः अफगाणिस्तानमधील अराजकतेसाठी जो बायडेन जबाबदार !

11 ऑगस्टः गिरी येथून सिद्धी नाईक बेपत्ता

11 ऑगस्ट रोजी नास्नोळा येथील 19 वर्षीय युवती सिद्धी नाईक ग्रीन पार्क जंक्शन वरून बेपत्ता झाली. सिद्धी ही पर्वरी येथे एका दुकानावर काम करत होती. 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांनी तिला प्रवासी बसमधून पर्वरीला जाण्यासाठी ग्रीन पार्क जंक्शनवर नेऊन सोडलं.

सकाळी १०.३० वा. तिच्या कामावरून ती दुकानात पोचली नसल्याचं फोन करून सांगण्यात आलं. शिवाय तिचा फोन लागत नव्हता. तिने आपला फोन घरीच ठेवलेला नंतर सापडला. याबाबत तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल केली.

बेपत्ता होण्यापूर्वी सिद्धीनेच्या फोनमधील फेसबूक आणि वॉट्सएप हे दोन्ही एप डिलीट करण्यात आले होते. मात्र ते कुणी डिलीट केले हा प्रश्न अद्याप कायम आहे.

12 ऑगस्टः सकाळी कळंगुट समुद्रकिनारी सापडला मृतदेह

बेपत्ता असलेल्या सिद्धीचा मृतदेह 12 ऑगस्ट रोजी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने अनेक तर्ककुतर्क व्यक्त केले जातायत.

हेही वाचाः वाजपेयी यांचे कार्य अविस्मरणीय

12 ऑगस्टः शवचिकित्सा अहवालातून बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट

शवचिकित्सा अहवालातून सिद्धीचा मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट झालं. तसंच तिनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्यामुळे अनेक तर्ककुतर्कही व्यक्त केले जातायत.

हेही वाचाः 7-सीटर जीप कमांडर दहा दिवसात भारतीय बाजारात

13 ऑगस्ट – विरोधकांचा मोर्चा

राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे घडत आहेत. या प्रकरणांमुळे राज्यातील महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सिद्धी नाईक हिच्या मृत्यू प्रकरणी काँग्रेससह गोवा फॉरवर्ड, रिव्होल्नरी गोवन्स पक्षांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला. त्याशिवाय पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर प्रश्नही उपस्थित केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तपासात दाखवलेल्या अतिघाईचा निषेध करताना महिला काँग्रेसने मोर्चा काढून निषेध नोंदवला.

हेही वाचाः PHOTO STORY | पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी

सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणी पोलिस गांभीयनि चौकशी करत नाहीत. भाजप महिला मोर्चाच्या महिला तर गायबच झाल्या आहेत. राज्यातील मंत्री, भाजपचे आमदार शांत आहेत. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत मुलांना संस्कार देण्याचा पालकांना उपदेश देतात. महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर नियंत्रण आणण्यासाठी जलदगती न्यायालय स्थापन करणं, फनान्सिक लॅबची निर्मिती करणं, गुन्द्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांना मुक्त वातावरण निर्माण करावं, अशी मागणी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बिना नाईक यांनी मोर्चा काढून केली.

हेही वाचाः ‘काँग्रेसला कुणाशीही युती करण्याची गरज नाही’

14 ऑगस्टः प्रकरणाचा पुर्नतपास करण्याचं आश्वासन

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार ग्लेन टिकलो यांनी सिद्धी नाईक हिच्या घरी भेट देऊन या प्रकरणाचा पुर्नतपास करण्याचं आश्वासन दिलं.

हेही वाचाः ‘आरबीआय’ने नियम बदलले! वाचा सविस्तर

14 ऑगस्टः ओळखीच्या एका बस वाहकाने सिद्धीला शेवटचं पाहिल्याचं पोलिस तपासातून उघड

म्हापसा बस स्थानकावर सिद्धीच्या ओळखीच्या एका बस वाहकाने त्या दिवशी तिला पाहिलं असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर. ती आपल्याच विचारात मग्न असल्याने तो वाहक तिच्याजवळ विचारपूस करण्यास गेला नाही, अशी माहिती पोलिस तपासात उघडकीस.

हेही वाचाः CRIME | मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला; नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा

14 ऑगस्टः मला हे प्रकरण अजून ताणायचं नाहीः सिद्धीचे वडील

माझी मुलगी या जगात आता नाही आहे, त्यामुळे अजून हे प्रकरण मला ताणून धरायचं नाही. यातून माझी मुलगी आणि कुटूंबाचीच बदनामी होईल, असे पोलिस जबानीत नमूद केल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचाः विराट कोहलीची ‘ही’ रणनीती चुकीची

14 ऑगस्टः सिद्धीच्या वडिलांचा पोलिसांवर आरोप

माझ्या बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी म्हापसा पोलिसांनी वेळीच तपास न केल्याने तिला आम्ही गमावलं. राज्य पोलिसांकडून अशाच प्रकारे निष्काळजीपणा केला जात असल्यामुळे गोव्यातील मुलींना जीव गमवावा लागत असल्याचा सिद्धीच्या वडिलांचा पोलिसांवर आरोप.

हेही वाचाः येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

14 ऑगस्टः विरोधी पक्षांकडून सरकारवर टीका

या प्रकरणाचा पोलिसांकडून योग्य पंचनामा आणि तपासकाम होऊ शकलेलं नाही, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

सिद्धीच्या मृत्यूचं गुढ अन् अनुत्तरीत असंख्य प्रश्न

सिध्दी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही ?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कुणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सऍप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

मानसिक तणावाखाली असलेल्या सिद्धीवर कुणाचा दबाव होता?

19 वर्षीय सिद्धीसोबत असं काय घडलं होती की जे ती घरच्यांपासून लपवत होती?

सिद्धीचा घरच्यांसोबत नेमका काय वाद झाला होता?

घरच्यांनी सिद्धीचा मोबाईल फोन का काढून घेतला होता?

हा व्हिडिओ पहाः DEATH | SUICIDE? | नास्नोळाच्या युवतीचा कळंगुट बिचवर मृतदेह

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!