सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणः आता नेरूलमध्ये पोलिस करणार तपास

सिद्धी नाईक मृत्यूपूर्वी म्हापशानंतर नेरूल भागात दिसली असल्याचं पोलिस तपासातून समोर

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसाः दिवसेंदिवस सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा गुंता वाढतच चालला आहे. पोलिस तपासात मयत सिद्धी नाईक ही गायब होण्यापूर्वी म्हापशानंतर नेरूल भागात दिसली असल्याचं समोर आलंय. त्यामुळे या माहितीच्या आधारे पोलिस आता नेरूल भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून शहानिशा करण्याच्या प्रयत्न करण्यात गुंतले आहेत. या मृत्यू प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी सध्या वेगवेगळ्या मार्गे आणि माहितीच्या आधारे बारकाईने पोलिसंकडून तपास सुरू आहे.

हेही वाचाः CRIME | कांदोळीत अज्ञाताचा मृतदेह सापडला

नेरूल तसंच आजुबाजुचा भाग काढला पिंजून

पोलिसांनी गुरूवारपासून नेरूल तसंच आजुबाजुच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची तपासणी सुरू केली आहे. हा परिसर पोलिसांनी पिंजून काढला आहे. यासाठी खास पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण रात्री उशीरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीच ठोस पुरावे लागले नसल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. म्हापसा बस स्थानकावरील तसंच शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्यानं पोलिसांना या प्रकरणी अपेक्षित माहिती मिळाली नव्हती. पण सिद्धी मृत्यूपूर्वी नेरूल भागात दिसल्यानं पोलिस तपासाला त्या दिशेने गती मिळाली आहे.  

एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करणं गैरः तानावडे

दरम्यान भाजप प्रदेक्षाध्यक्षांनी विरोधकांना खडे बोल सुनावलेत. विरोधकांना एकाद्या विषयावरून राजकारण करण्याचा अधिकार आहे. पण निवडणूका जवळ आल्यानं विरोधक सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण विनाकारण भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात विरोधकांची चूक आहे असं मी मानत नाही. कारण विरोधकांचं ते कामच. पण एखाद्याच्या मृत्यूचं राजकारण करणं गैर आहे, असं मत भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी व्यक्त केलं.

हेही वाचाः ओशेल शिवोलीत दोघा रशियन युवतींचा मृत्यू

पीडितेच्या वडिलांना आमचा पूर्ण पाठिंबा

विरोधकांनी राजकारण करावं, पण राजकीय पोळी भाजताना वैयक्तिक पातळीवर जाऊ नये. पीडिता सिद्धी नाईक आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी सरकार आणि पोलिसांकडून योग्य तपास सुरू आहे. पीडितेच्या वडिलांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा किंवा पोलिसांवर कुठलाही दबाव नाही. याप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे आणि कोणतीही आडकाठी येत असल्यास आमचं सरकारला सहकार्य आहेच, असं तानावडे म्हणाले.

हेही वाचाः अफगाणिस्तानच्या पुनर्बांधणीसाठी तालिबानचं चीनला आमंत्रण

सरदेसाईंनी घेतली सिद्धी नाईकच्या कुटुंबियांची भेट

गुरूवारी रात्री उशीरा गोवा फारवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई आणि कार्याध्यक्ष किरण कांदोळकर यांनी  मयत सिद्धी नाईक हिच्या घरी भेट दिली आणि त्यांचं सांत्वन केलं. सुमारे तास दीड तास त्यांनी पीडितीच्या कुटुंबियांशी संवाद साधून चर्चा केली.

काय आहे प्रकरण?

11 ऑगस्ट रोजी नास्नोळा येथील 19 वर्षीय युवती सिद्धी नाईक ग्रीन पार्क जंक्शन वरून बेपत्ता झाली. सिद्धी ही पर्वरी येथे एका दुकानावर काम करत होती. 11 ऑगस्ट रोजी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांनी तिला प्रवासी बसमधून पर्वरीला जाण्यासाठी ग्रीन पार्क जंक्शनवर नेऊन सोडलं.

सकाळी १०.३० वा. तिच्या कामावरून ती दुकानात पोचली नसल्याचं फोन करून सांगण्यात आलं. शिवाय तिचा फोन लागत नव्हता. तिने आपला फोन घरीच ठेवलेला नंतर सापडला. याबाबत तिच्या वडिलांनी ती बेपत्ता झाली असल्याची तक्रार म्हापसा पोलिसात दाखल केली.

हेही वाचाः सहकार अर्बन क्रेडिट सहकारी सोसायटीवर प्रशासक नेमा

बेपत्ता होण्यापूर्वी सिद्धीनेच्या फोनमधील फेसबूक आणि वॉट्सएप हे दोन्ही एप डिलीट करण्यात आले होते. मात्र ते कुणी डिलीट केले हा प्रश्न अद्याप कायम आहे.

बेपत्ता असलेल्या सिद्धीचा मृतदेह 12 ऑगस्ट रोजी कळंगुट समुद्र किनाऱ्यावर सापडला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडल्याने अनेक तर्ककुतर्क व्यक्त केले जातायत. शवचिकित्सा अहवालातून सिद्धीचा मृत्यू बुडून झाल्याचं स्पष्ट झालं. तसंच तिनं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला गेला. मात्र मृतदेह अर्धनग्न अवस्थेत असल्यामुळे अनेक तर्ककुतर्कही व्यक्त केले जातायत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Breaking | Siddhi Naik Death Case | Crime | सिद्धी नाईक मृत्यू प्रकरणाचा लवकरच छडा

सिद्धीच्या मृत्यूचं गुढ अन् अनुत्तरीत असंख्य प्रश्न

सिध्दी नाईक पर्वरीला न जाता समुद्रकिनारी कशी पोचली?

म्हापसा बस स्थानकावरील सीसीटीव्ही बंद असल्यानं ती बस स्थानकावर होती की नाही ?

बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट; मात्र अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यानं ती पाण्यात कशी सापडली? तिच्या अंगावरील कपडे कुठे गेले?

घराबाहेर पडल्यानंतर सिद्धी पर्वरीला जाण्याऐवजी कळंगुटला कशी काय पोहोचली?

जर तिला आत्महत्या करायची होती, तर तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत का आढळला?

सिद्धी नाईकचा बुडून जीव गेला असेल, तर तिला पाण्यात कुणी ढकललं होतं?

मोबाईल फोन घरी ठेवून सिद्धी घराबाहेर का पडली असेल?

फेसबुक आणि व्हॉट्सऍप डीलीट करुन सिद्धी नेमकं काय लपवू पाहत होती?

मानसिक तणावाखाली असलेल्या सिद्धीवर कुणाचा दबाव होता?

19 वर्षीय सिद्धीसोबत असं काय घडलं होती की जे ती घरच्यांपासून लपवत होती?

सिद्धीचा घरच्यांसोबत नेमका काय वाद झाला होता?

घरच्यांनी सिद्धीचा मोबाईल फोन का काढून घेतला होता?

हा व्हिडिओ पहाः VIDEO | Panchnama | Crime | Siddhi Death Case | सिद्धी नाईकला वाचवणं खरंच शक्य नव्हतं का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!