सिद्धेश नाईक यांची नाराजी दूर

सदानंद शेट तानावडे ; नाईक भाजपचे गोवा प्रदेश सचिव म्हणून नियुक्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारतीय जनता पक्षाचे कुंभारजुवे मतदारसंघातील जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांची नाराजी दूर झाली असून पक्षाने त्यांना गोवा प्रदेश भाजपचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आज दिली. पणजी येथील भाजपाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर व सिद्धेश नाईक उपस्थित होते.
हेही वाचाःमतदानाद्वारे पणजीवासीय योग्य तो निर्णय घेतील

भाजपा हा देश प्रथम आणि पक्ष प्रथम तत्त्वावर चालणारा पक्ष!

१४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी अनेक नेत्यांंची भाजपची उमेदवारी आपणास मिळावी अशी अपेक्षा होती . मात्र सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. भाजपा हा देश प्रथम आणि पक्ष प्रथम या तत्त्वावर चालणारा पक्ष असून भाजपाचे नेते कधीच स्वहिताचा विचार करत नसतात. त्यामुळे पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यासोबत राहणे महत्त्वाचे असते. माजी मंत्री दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, जि.पं. सदस्य गिरीश उस्कैकर, नावेली येथील सत्यविजय नाईक आदी अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसतानाही ते पक्षासोबत राहिले आहेत. त्यामुळे आपण पक्षातर्फे आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्या तर्फे त्यांचे अभिनंदन करत असल्याचे तानावडे यावेळी म्हणाले.
हेही वाचाःमालपेत ट्रकचा अपघात ; सुदैवानं जीवितहानी नाही

नाईक यांनी अनेक पदावर काम केल्याने उमेदवारी मागणे स्वाभाविक!

सिद्धेश नाईक हे केंद्रीय मंत्री व भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद नाईक यांचे चिरंजीव असले तरी त्यांनी तळागाळात भाजपसाठी काम केलेले आहे. विद्यार्थी परिषदेपासून ते युवा मोर्चाचे सरचिटणीस , कुंभारजुवा भाजपा मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अशा अनेक पदावर त्यांनी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागणे स्वाभाविक आहे.
हेही वाचाःकाँग्रेस भ्रष्टाचारमुक्त आणि मजबूत, स्थिर सरकार देईल

पक्षाने घेतलेला निर्णय आपणाला मान्य

पक्षाने घेतलेला निर्णय आपण मान्य केलेला असून आपणाकडे वास्को मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आपण तेथे निवडणुकीचे काम करणार आहे. असे सिद्धेश नाईक यांनी यावेळी सांगितले. आपण जरी वास्को मध्ये निवडणुकीच्या काळात काम करत राहिलो तरी, आपले समर्थक कुंभारजुवे मतदारसंघात पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासाठीच काम करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.
शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीयांची लगबग

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!