देवाला नमस्कार करतानाचा पत्नीसोबतचा फोटो ठरला शेवटचा फोटो

केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अंकोला येथे भीषण अपघात झाला.

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयूषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या वाहनाला अंकोला येथे भीषण अपघात झाला. सोमवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात त्यांच्या पत्नी आणि निजी सचिव ठार झाल्याची माहिती असून श्रीपाद नाईक हे गंभीर जखमी आहेत. यल्लापूरा येथे हा अपघात झाल्याची खबर आहे. या अपघातानंतर श्रीपाद नाईक यांच्या पत्नीसोबतचा त्यांचा शेवटचा फोटो समोर आलाय.

देवळात केली एकत्र पुजा

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीपाद नाईक यांचा पत्नीसोबतचा हा शेवटचा फोटो आहे. अपघात होण्याअगोदर काही तासांपूर्वी श्रीपाद नाईकांचा त्यांच्या पत्नीसोबत हा फोटो घेण्यात आलाया. कर्नाटकातील एका देवळात अपघात होण्याअगोदर काही तासांपूर्वी त्यांनी आपल्या पत्नीसह पुजा केली होती. ही त्यांची पत्नीसोबतची शेवटची पुजा ठरला. यानंतर काही तासांतच त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी येऊन धडकली. आणि राज्यात खळबळ माजली.

श्रीपाद नाईकांवर जीएमसीत उपचार सुरू

या अपघातात श्रीपाद नाईक यांच्या पत्नी तसंच त्यांच्या सचिवाचा मृत्यू झाला. तर श्रीपाद नाईकांवर जीएमसीत सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत लवकरच सुधारणा व्हावी यासाठी सर्वजण प्रार्थना करतायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!