श्रीरामसेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांची प्रा. सुभाष वेलिंगकरांनी घेतली भेट

गेली 9 वर्षं सातत्याने भाजप सरकार मुतालिक यांच्या गोवा प्रवेशावर बंदी घालत आलंय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः केवळ अल्पसंख्यांकांचा अनुनय करण्यासाठीच 2012 मध्ये सत्तेवर आलेल्या स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील भाजपा सरकारपासून ते सलगपणे सध्याच्या डाॅ. प्रमोद सावंत सरकारपर्यंत, भाजपा सरकार आजतागायत गेली 9 वर्षं दर सहा महिन्यांनी श्रीरामसेना तसंच या संघटनेच्या नेत्याच्या गोवा-प्रवेशासाठी बंदी घालत आलं आहे. त्या श्रीरामसेनेचे प्रमुख मा. प्रमोदजी मुतालिक यांची खास भेट भारतमाता की जय संघ(गोवा) चे राज्य संघचालक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बेळगावी येथे घेतली.

मुतालिकांनी केली भारतमाता की जय संघाच्या कार्याची प्रशंसा

संघाचे राज्य कार्यवाह प्रा. प्रविण नेसवणकर, सहकार्यवाह प्रा. दत्ता पु. नाईक( शिरोडा), व्यवस्थाप्रमुख सूर्यकांत गावस व राज्य धर्म रक्षा-दल प्रमुख नितीन फळदेसाई यांचा या शिष्टमंडळात समावेश होता. हिंदु समाजावरील अन्याय, अत्याचार, सेक्युलारिझमच्या नावाखाली चाललेला पक्षपात, उभय संघटनांच्यातर्फे हिंदु समाजाचे ऐक्य व सुरक्षेसाठी चाललेलं कार्य समजून घेणं, आणि आगामी काळात कशा प्रकारे हिंदु-संघटनाच्या कार्यात परस्पर- पूरक कार्य करता येईल अशा अनेक विषयांवर सुमारे अडीज तास चांगला संवाद या भेटीत साधला गेला.
यासमयी मा.प्रमोदजी मुतालिकांनी, भारतमाता की जय संघाच्या कार्याची प्रशंसा करून , प्रातिनिधिक स्वरुपात प्रा. सुभाष वेलिंगकरांचा सत्कार केला.

त्या निवेदनांना आतापर्यंत कचऱ्याची टोपलीच दाखवली आहे

ज्या जिहादी संघटनेच्या प्रमुख नेत्यांना जातीय हिंसाचाराच्या आरोपांखाली अटक करण्यात आलेली आहे आणि ज्या धर्मांध संघटनेचे आतंकवादी आय.एस.आय.संघटनेशी असलेल्या संबंधांचे पुरावे केंद्र सरकारला तपासात सापडलेले आहेत, अशा त्या गोवा राज्यातही गोवाभर सक्रीय असलेल्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)वर बंदी घालण्याची मागणी येथील अनेक स्वयंसेवी संघटनांनी वारंवार लेखी स्वरुपात गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांना देऊनही, अल्पसंख्यांकांची मते डोळ्यांमोर ठेवून, त्या निवेदनांना आतापर्यंत कचऱ्याची टोपलीच दाखवलेली आहे, ही लोक सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे.

दर सहा महिन्यांनी श्रीरामसेना आणि मा. प्रमोदजी मुतालिकांवरील बंदीत वाढ

गोव्यात प्रत्यक्षात काम सुरू न करताही आणि कायदा व सुव्यवस्थेचा कसलाही प्रश्न उद्भवलेला नसताना देखील, अल्पसंख्यांकांना खुश करण्यासाठी गोवा सरकार तत्परतेने, दर सहा महिन्यांनी श्रीरामसेना आणि मा. प्रमोदजी मुतालिकांवर बंदी वाढवत आहे, हे निषेधार्ह आहे.

हिंदु संघटना श्रीरामसेनेवर निष्कारण घातलेली बंदी त्वरित उठवावी

भारतमाता की जय संघ गोवा सरकारकडे निकराची मागणी करित आहे की हिंदु संघटना श्रीरामसेनेवर निष्कारण घातलेली बंदी त्वरित उठवावी आणि आपला निःपक्षपातीपणा सिद्ध करावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!