डोंगरी शांतादुर्गा मंदिरात दिवजोत्सव उत्साहात

कोविडमुळे हा उत्सव साध्या पद्धतीनं

Goan Varta Live | प्रतिनिधी

गोवा वेल्हा:डोंगरी डोंगरमाथा येथील श्री षष्टी शांतादुर्गा मंदिरात कार्तिकी पंचमीचा वार्षिक पालखी व दिवजोत्सव शनिवारी ५ रोजी साजरा झाला. तारीवाडा-तोरंग मंडळ यांनी या सोहळ्याचे यजमानपद भूषविले होते.यानिमित्त सकाळी मंदिरात श्रींस अभिषेक, धार्मिक विधी, आरत्या व तीर्थप्रसाद आदी कार्यक्रम झाले. संध्याकाळी मंदिरात भजनाचा कार्यक्रम रंगला. यात स्थानिक भजनी कलाकारांनी भाग घेतला.

श्री षष्टी शांतादुर्गा देवीची पालखी

त्यानंतर रात्री आठ वाजता सजलेल्या पालखीतून श्रींची मंदिर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. यात सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. भजन दिंडीत पुरुषांनी भाग घेतला.डोंगर माथ्यावरील श्री षष्टी शांतादुर्गा देवस्थान व तारीवाडा तोरंग मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
हा उत्सव साजरा झाला.

यंदा कोविडमुळे हा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.या उत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे रात्री आठ वाजल्यापासून मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी व दिवजोत्सव साजरा झाला. या मिरवणुकीत सर्वांनी सहकार्य केले. मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर पावणी, आरत्या व तीर्थप्रसाद याचा लाभ भाविकांनी घेतला. दिवसभरात भाविकांनी मंदिरातील व पालखीतील श्रींच्या मूर्तीचे दर्शन घेतले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.