खुटवळच्या श्री ब्राह्मणी देवीचा बुधवारी जत्रोत्सव
गोव्यासह महाराष्ट्रातीलही अनेक भाविक घेतात दर्शन

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पेडणे : खुटवळ येथील श्री ब्राह्मणी देवीचा जत्रोत्सव बुधवार दि. 30 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे.
या निमित्त धार्मिक विधींसह ओटी भरणे, गार्हाणे आदी कार्यक्रम होतील. रात्री देवीची पालखी निघाल्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळ, मोचेमाड-वेंगुर्ले यांचा नाट्यप्रयोग होईल.
या जत्रोत्सवाला गोव्यासह महाराष्ट्रातूनही अनेक भाविक हजेरी लावून देवीचं दर्शन घेतात. भाविकांनी कोरोनासंबंधीच्या एसओपींचं पालन करून दर्शन घ्यावं, असं आवाहन देवस्थान समिती आणि ग्रामस्थांनी केलं आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.