गोवा मराठी चित्रपट महोत्सवात बरसणार 22 सिनेमांच्या श्रावणसरी…

'सहेला रे' चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने महोत्सवाचा पडदा उघडला जाणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गेली दोन वर्षे कोविड महामारीमुळे होऊ न शकलेला गोवा मराठी चित्रपट महोत्सव यंदा दणक्यात साजरा केला जाणार आहे. गोमचिमचे यंदाचे 13 वे वर्ष असून 5, 6 आणि 7 ऑगस्ट रोजी पणजी येथील आयनॉक्स आणि मॅकेनिझ पॅलेस मध्ये हा महोत्सव पार पडणार आहे. आयएफबी मुख्य प्रायोजक असलेल्या यंदाच्या 13 व्या गोमचिम मध्ये 22 दर्जेदार सिनेमा प्रदर्शित केले जाणार आहेत. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शीत ‘सहेला रे’ या चित्रपटाच्या जागतिक प्रीमियरने महोत्सवाचा पडदा उघडला जाणार आहे.
हेही वाचा:250 चे तिकीट 500 ते 800 रूपये; लॉटरी तिकिटांंची ब्लॅकमध्ये विक्री…

मराठी चित्रपटसृष्टीतील 50 दिग्गज तारे तारका हजेरी लावणार

5 ऑगस्ट रोजी आयनॉक्स मध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोमचिमचे उद्धाटन केले जाणार असून कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. उद्धाटन सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी मध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरवीले जाणार आहे. गोव्याशी नाळ जोडली असलेल्या अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी बरोबरच रंगभूमीवर गेली 5 दशके दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना यंदाचा कृतज्ञता पुरस्कार जाहिर झाला आहे. या दिमाखदार सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी मधील 50 दिग्गज तारे तारका हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा:अमेरिकेने अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा केला खात्मा…

दिग्दर्शक, कलाकार महोत्सवास हजेरी लावणार

अमृता खानवीलकर, प्रसाद ओक, उमेश कामत, सुहास जोशी, अनिकेत विश्वासराव, किशोर कदम, मृण्मयी गोडबोले, हेमांगी कवी, जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, नेहा पेंडसे, हृता दुर्गुले, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, छाया कदम, मोहन आगाशे, राहुल देशपांडे यांच्यासह दिग्गज कलाकार गोमचिमला उपस्थित राहून शोभा वाढवणार आहेत. बहुतेक सर्व चित्रपटांचे दिग्दर्शक आणि कलाकार महोत्सवात हजेरी लावून महोत्सव प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. रवी जाधव, गजेंद्र अहिरे, संजय जाधव, आदित्य सरपोतदार हे दिग्गज दिग्दर्शक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत.
हेही वाचा:GOA | मद्यप्राशन करून वाहन चालवाल तर तुरुंगात जाल…

प्रतिनिधी होण्यासाठी मिळणारा प्रतिसाद वाढताच

गोमचिमचे संचालक संजय शेट्ये म्हणाले, गोमचिम मधून आम्ही गोमंतकीयांना दर्जेदार मराठी चित्रपटांची केवळ पर्वणी उपलब्ध करून देत नाही तर हा महोत्सव म्हणजे मराठी चित्रपट सृष्टी मधील दिग्गज कलाकार आणि चित्रपट प्रेमी यांचे अनोखे संमेलन ठरत आहे. मराठी मधील नवीन चित्रपट गोमचिम मध्ये प्रदर्शित व्हावेत यासाठी जशी चढाओढ पहायला मिळते तसाच महोत्सवामध्ये प्रतिनिधी होण्यासाठी देखील मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढतच आहे.
गोमचिमच्या ऑनलाइन आणि प्रत्यक्ष प्रतिनिधी नोंदणीला सुरुवात झाली असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे शेट्ये म्हणाले.
हेही वाचा:WhatsApp Trick | ‘इंटरनेट’ नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप, जाणून घ्या जबरदस्त ‘ट्रिक’

दाखवण्यात येणारे चित्रपट

चित्रपट : सहेला रे
दिग्दर्शक : मृणाल कुलकर्णी

चित्रपट : ताठ कणा
दिग्दर्शक : गिरीश मोहीते

चित्रपट : पोटरा
दिग्दर्शक : शंकर धोत्रे

चित्रपट : झोंबिवली
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार

चित्रपट : गोदाकाठ
दिग्दर्शक : गजेंद्र अहिरे

चित्रपट : सुमित्रा भावे- एक समांतर प्रवास
दिग्दर्शक : डॉ. संतोष पाठारे

चित्रपट : मी वसंतराव
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी

चित्रपट : तिचं शहर होणं
दिग्दर्शक : रसिका आगाशे

चित्रपट : गोदावरी
दिग्दर्शक : निखिल महाजन

चित्रपट : टायम पास – ३
दिग्दर्शक : रवी जाधव

चित्रपट : वाय
दिग्दर्शक : अजित वाडीकर

चित्रपट : ये रे ये रे पावसा
दिग्दर्शक : शफाक खान

चित्रपट : चंद्रमुखी
दिग्दर्शक : प्रसाद ओक

चित्रपट : गोष्ट एका पैठणीची
दिग्दर्शक : शंतनू रोडे

चित्रपट : दीड
दिग्दर्शक : ंॐकार बर्वे

चित्रपट : जून
दिग्दर्शक : सुह्रद गोडबोले / वैभवी खिस्ती

चित्रपट : क्रिप्टो आजी
दिग्दर्शक : अमित अगरवाल

चित्रपट : कडू गोड
दिग्दर्शक :अनंत महादेवन

चित्रपट : तमाशा लायव्ह
दिग्दर्शक : संजय जाधव

चित्रपट : पॉंडिचेरी
दिग्दर्शक : सचिन कुंडलकर

चित्रपट : वागरो (कोंकणी)
दिग्दर्शक : साईनाथ उसकयकार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!