मांद्रेतील नागरिकांनी केले श्रमदान

नागरिकांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यांवरील खड्डे

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचंच समीकरण आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही प्रशासन ढिम्म असतं. आता तर पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी खड्डे आहेत. पावसाचं पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे रस्त्यांची डागडुजी करून खड्डे बुजवून रस्त्याचं नूतनीकरण करावं, अशी मागणी राज्यातील नागरिकांनी केली आहे. मात्र मांद्रेत एक वेगळंच चित्र पहायला मिळालंय.

हेही वाचाः आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ता तांबडी सुर्लात गायन मैफल

मांद्रे नागरिकांकडून श्रमदान

मांद्रेतील नागरिक गावातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यास सरसावले. पावसात रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताच्या घटना घडतात. शिवाय पादचाऱ्यांनाही याचा त्रास होतो. त्यामुळे केवळ प्रशासनाची वाट न पाहता, काही नागरिकांनी स्वत: हातात कुदळ, फावडे घेत गावातील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा पुन्हा 50 हजारांवर

नागरिकांनी स्वखर्चाने बुजवले रस्त्यांवरील खड्डे

सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्यांची डागडुजी करण्यात दिरंगाई होत आहे. त्यामुळे पेडण्यात अनेक ठिकाणी रस्त्यांना भलेमोठे खड्डे पडलेत. त्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याचं चित्र पहायला मिळतंय. अश्याच प्रकारचा एक खड्डेमय रस्ता म्हणजे देऊळवाडा-मांद्रे ते दांडोस वाडा मांद्रे येथील. मात्र येथील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची आणि सरकारच्या मदतीची अपेक्षा न करता बिद्रू बाग मांद्रे येथील श्री गंगाळदेव देवस्थानचे काही पदाधिकारी आणि वाड्यावरील नागरिकांनी पुढाकार घेऊन रस्त्याची दुरुस्ती केली. स्वखर्चाने रस्त्यावरील खड्डे बुजवले. तसंच खड्ड्यात सिमेंट घालून ते पूर्ववत केलं. त्याबद्दल या नागरिकांचं सर्वत्र कौतुक होतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!