सेंद्रिय कृषीविषयक प्रशिक्षण दिलेले किमान 500 शेतकरी दाखवाच

आरजीच्या मनोज परबांचे कृषीमंत्री कवळेकरांना आव्हान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कृषी खात्याने प्रशिक्षण देऊन शेती व्यवसाय सुरू केलेले किमान पाचशे शेतकरी दाखवा, मी रिव्होल्यूशनरी गोवन्स संघटना सोडण्यास तयार असल्याचं आव्हान (आरजी) चे अध्यक्ष मनोज परब यांनी फोंड्यात सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिलं. यावेळी आरजीचे प्रेमानंद गावडे, निखिल कवळेकर, विश्वेश नाईक आणि मीना फर्नांडिस आदी उपस्थित होते.

हेही वाचाः वेर्णा अपघातात दोघे ठार

किमान पाचशे शेतकरी दाखवा

कृषिमंत्री तथा उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांनी एका कार्यक्रमात सांगितलं आहे की, गोवा राज्य आता ‘ऑर्गेनिक कृषी राज्य’ म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यातील तेरा हजार शेतकऱ्यांना कृषिविषयक प्रशिक्षण दिलं आहे. कोरोना काळात कुठल्या तालुक्यात हे प्रशिक्षण दिलं, असा सवाल करून किमान पाचशे शेतकरी दाखवा, असं आव्हानच आरजीतर्फे देण्यात आलं आहे. या तेरा हजार प्रशिक्षित शेतकऱ्यांची नावं, पत्ता आणि त्यांचा फोन क्रमांक सरकारी संकेत स्थळावर जाहीर करा, असं सांगून यासंबंधी आरटीआयअंतर्गत माहिती आरजीकडून मागितली जाणार असल्याचंही परब यांनी सांगितलं.

हेही वाचाः अर्भक कचराकुंडीत फेकणारी माता सापडली

सरकारने कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय केलं ते सांगावं

कृषिमंत्री ऑर्गेनिक फार्मिंगचा आग्रह धरतात आणि ऑर्गेनिक राज्य जाहीर करणार असल्याचं सांगतात, मग शेतकऱ्यांना युरिया खतांचं वाटप कसं काय केलं जातं? शेतीचं रूपांतर करून बाहेरील लोकांच्या घशात येथील शेतजमीन घालण्याचा प्रकार चालला आहे. सरकारने कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय केलं ते सांगावं. कोणता मास्टर प्लॅन तयार केला, कृषी संबंधीच्या कोणत्या समस्या सोडवल्या? काणकोण ते पेडणेच्या चौपदरी रस्त्यासाठी शेत जमिनीत मातीचा भराव टाकून शेतीची वाट लावण्यात आली. कोणतंच नियोजन नसल्यानं जलस्त्रोत नष्ट करण्यात आले. माती कुठून आणि कुठून पाणी शेतीत घुसतं हेच मुळी या लोकांना सध्या माहिती नाही. त्यामुळे शेतीची प्रचंड नासाडी झाल्याचंही परबांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!