धक्कादायक ! आता नाल्यातल्या पाण्यात आढळला कोरोना विषाणू

उत्तरप्रदेशात आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओननं तपासले पाण्याचे नमुने

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : संसर्ग झाल्यानं कोरोना होतो. तो हवेतूनही पसरतो, अशीही बातमी होती. आता तो नाल्यातल्या पाण्यातही आढळून आलाय. पाण्यात कोरोना व्हायरस आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. तेव्हा तपासणीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इथल्या नाल्यातल्या पाण्यात आढळला विषाणू

उत्तर प्रदेशात नदीपात्रात वाहत असलेल्या मृतदेहांवरून पाण्यात व्हायरस पसरल्याची चर्चा जोर धरत होती. त्यामुळे आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यास सुरुवात केली होती. पाण्याचे नमुने तपासणीसाठी ८ सेंटर तयार केले गेले आहेत. लखनौमधल्या रुकपूर, घंटाघर आणि मछली मोहाल भागातील नाल्यामधून पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. १९ मे रोजी या नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. तेव्हा रुकपूर खदरा येथील नाल्यातील पाण्यात कोरोना व्हायरस असल्याचं आढळून आलं आहे. एसजीपीआय लॅबनं याबाबतची माहिती संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

यावर संशोधनाची आवश्यकता !

‘काही दिवसांपूर्वी आम्ही रुग्णाचा अभ्यास केला होता. तेव्हा आम्हाला भिती होती की, त्याच्या विष्ठेतील व्हायरस पाण्यात पोहोचू शकतो. जे लोक कोरोना पॉझिटीव्ह असताना होम आयसोलेट होतात, त्याच्या विष्ठेतून व्हायरस नाल्यांपर्यंत पोहोचू शकतो. नाल्यामधून पाणी थेट नदीपात्रात पोहोचतं. या पाण्यातून कोरोना व्हायरसचा फैलाव होणार की नाही, हा संशोधनाचा विषय आहे. त्याचा नागरिकांच्या जीवाला किती धोका आहे हे अभ्यासाअंती कळू शकेल.’, असं डॉक्टर उज्ज्वला घोषाल यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!