धक्कादायक : या भागात डेंग्यूचे १० संशयास्पद रुग्ण…

फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे पंच मंडळासमवेत केली जागृती

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : दत्तगड – बेतोडा येथे गेल्या १५-२० दिवसांपासून डेंग्यूचे अंदाजे १० संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत. स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विविध उपाय करण्यात आले आहेत. सोमवारी स्थानिक पंचायत मंडळासमवेत परिसराची पाहणी करून लोकांमध्ये डेंग्यूसंबंधी जागृती करण्यात आली.
हेही वाचाःगोवा डेअरी ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार…

दत्तगड भागात डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण

टँकरमधून पुरवठा होणारे पाणी अधिक दिवस साठवून ठेवले जात असल्याने डेंग्यू पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून दत्तगड भागात डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्रातर्फे सर्वप्रथम परिसरात औषंधाची फवारणी केली होती. सोमवारी आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांनी सरपंच विशांत गावकर, पंच सदस्य दुर्गाप्रसाद वैद्य, स्वच्छता विभागाचे निरीक्षक मनोज नाईक, बांधकाम खात्याचे अभियंत्यासह परिसरात जाऊन पाहणी केली.
हेही वाचाःगोमेकॉच्या इमारतीवरून रुग्णाने मारली उडी, ‘हे’ आहे कारण…

घरांतील सांडपाणी उघड्यावर सोडले जाते

या परिसरात नळाचे पाणी उपलब्ध होत नसल्याने लोकांना टँकरमधून पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे लोक टँकरचे पाणी ८ दिवसांपेक्षा अधिक वेळ साठवून ठेवत असल्याचे आढळून आले, तसेच कित्येक घरांतील सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आले. यावेळी अधिकाऱ्यांनी परिसरात फिरून लोकांमध्ये डेंग्यू संदर्भात जागृती केली. टँकरमधून पुरवठा होणारे पाणी दर २-३ दिवसानी भांडी खाली करा तसेच उघड्यावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्यासंबंधी माहिती करून देण्यात आली. परिसरात स्थिती पूर्ण नियंत्रण येईपर्यंत आरोग्य खात्याचे कर्मचारी उपस्थित राहून लोकांमध्ये जागृती करणार आहेत.
हेही वाचाःराज्यासाठी शुक्रवार ठरला ‘घातवार’…

रुग्णांची स्थिती सुधारत आहे

बेतोडा परिसरात १० डेंग्यूचे संशयास्पद रुग्ण आढळून आले आहेत. सर्व रुग्णांची स्थिती सुधारत आहे. या परिसरात टँकरचे पाणी अधिक दिवस साठवून ठेवले जात असल्याचे आढळून आले आहे. टँकरचे पाणी साठवून न ठेवता २ ते ३ दिवसांनी पाण्याची भांडी रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. उघड्यावर सोडण्यात आलेल्या सांडपाण्याची व्यवस्था येत्या ८ दिवसांत न केल्यास कडक कारवाई करण्यात आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांनी सांगितले.
हेही वाचाःविश्वजीत राणे ‘अज्ञानी’!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!