शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजूषा, नाट्यप्रवेश स्पर्धा

विजेत्यांना मिळणार भरघोस रकमेची बक्षिसे

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळ्याचा एक भाग म्हणून माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे दि. 19 फेब्रुवारी रोजी फर्मागुडी-फोंडा येथे अखिल गोवा आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा स्पर्धा तसेच माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अखिल गोवा नाट्यप्रवेश स्पर्धा आयोजित केली आहे.

शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि महाराजांचे जीवन व कार्य (1627 ते 1680) यांवर भर देणे हा या स्पर्धेचा विषय असेल. ही स्पर्धा सकाळी 9 वाजल्यापासून फर्मागुडी येथील गणपती मंदिराच्या आवारात घेतली जाईल. आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजुषेच्या विजेत्यांना रु. 10,000, रु. 7000 आणि रु. 5000 अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसे देण्यात येतील. त्या शिवाय प्रत्येकी रु. 1000ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसे असतील. त्या आज घेतो.

नाट्यप्रवेश स्पर्धेतील विजेत्यांना रु. 10,000, रु. 7000 आणि रु. 5000 अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिसे देण्यात येतील. तसेच स्पर्धेत भाग घेणार्‍या सर्व शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात येतील.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.