शिवजयंतीदिनी कळंगुटपर्यंत मिरवणूक नेणारच

शिवप्रेमींचा निर्धार, उपजिल्हाधिकाऱ्यांची परवानही अद्याप नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसाः तिथीनुसार होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमानिमित्त बुधवारी ३१ मार्च रोजी संध्याकाळी म्हापसा ते कळंगुट व परत अशी गोवाभरातील शिवप्रेमींची भव्य मिरवणूक नेण्यावर एका बैठकीत शिक्कामोर्तब झालंय. शासकीय यंत्रणेकडून परवानगी मिळाली नाही तरीसुद्धा मिरवणूक नेणारच असा निर्धार शिवप्रेमींनी केलाय.

हेही वाचाः HOSPITAL ON FIRE | सनराईज हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव

मिरवणुकीच्या यशस्वी आयोजनासाठी शिवप्रेमींच्या संघटनेकडून जनसंपर्क

या मिरवणुकीचं आयोजन यशस्वी व्हावं यासाठी गोवाभरातील शिवप्रेमींच्या संघटनेचे प्रमुख विश्वेश प्रभू जनसंपर्क करतायत. मिरवणुकीला कळंगुटवासीयांचंही सक्रिय सहकार्य मिळावं यासाठी बुधवारी रात्री कळंगुट येथे ‘गोमंतक श्रीछत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी संघटने’च्या पुढाकारान बैठक घेण्यात आली. या मिरवणुकीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. परवानगीसाठी गोमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवप्रेमी संघटनेतर्फे १९ मार्च रोजी पत्र सादर केलं होतं. इतके दिवस उलटून गेले तरी त्यांना अजूनही परवानगी मिळालेली नाही. शासकीय यंत्रणेकडून परवानगी मिळाली नाही तरी मिरवणुकीचं आयोजन करायलाच हवं, असं मत शिवप्रेमींनी त्या बैठकीत व्यक्त केलं.

हेही वाचाः दूध उत्पादकांना गोवा डेअरी देणार दरफरक

कळंगुट येथे बैठकीचं आयोजन

त्या बैठकीला कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गुरुदास शिरोडकर, सचिव प्रशांत रासईकर, कार्यकारिणी सदस्य आनंदराव देसाई तसंच अन्य मिळून सुमारे दहा पदाधिकारी उपस्थित होते. राज्यभरातील शिवप्रेमींचे प्रतिनिधी या नात्याने राजेंद्र वेलिंगकर, सुदेश तिवरेकर, अभय सामंत, रवी हरमलकर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं.

हेही वाचाः साळ गडे उत्सवाबाबत सरकारी यंत्रणेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

म्हापसा येथील हुतात्मा चौकातून मिरवणुकीची सुरुवात

या मिरवणुकीचा प्रारंभ म्हापसा येथील हुतात्मा चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृता या मिरवणुकीचा प्रारंभ म्हापसा येथील हुतात्मा चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परिसरात होणार आहे. त्यानंतर ती मिरवणूक साळगावमार्गे कळंगुटपर्यंत जाईल. तेथील श्रीशांतादुर्गा देवीचे आशीर्वाद घेऊन शिवछत्रपतींचा जयघोष केला जाईल व नंतर हडफडेमार्गे म्हापशात परत येऊन बोडगेश्वर मंदिराच्या परिसरात सांगता केली जाईल.

मिरवणुकीत गोव्यातील शिवप्रेमी होणार सहभागी

या मिरवणुकीत गोव्यातील सर्व तालुक्यांतील शिवप्रेमी सहभागी होणार असून, त्या अनुषंगाने सर्व तालुक्यांतील स्थानिक शिवप्रेमींचं सहकार्य घेतलं जात आहे. कळंगुटमधील शिवप्रेमींचाही उत्स्फूर्त प्रतिसाद या मिरवणुकीस लाभावा यासाठी काही प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक शुक्रवार २६ रोजी दुपारी ३.३० वाजता कळंगुट येथे घेण्यात येणार असून, त्यासाठी शिवप्रेमींनी तेथील श्री शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात एकत्रित व्हावं, असं आवाहन आयोजकांनी केलंय. ती बैठक संपल्यानंतर लगेच मिरवणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

गुरुदास शिरोडकर म्हणाले…

यासंदर्भात बोलताना कळंगुट येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष गुरदास शिरोडकर म्हणाले, या मिरवणुकीसंदर्भात गोवाभरातील शिवप्रेमींच्या संघटनेने कळंगुटवासीयांचं सहकार्य मिळावं यासाठी विनंती केली असून त्यानुसार आमची समिती त्या मिरवणुकीचं स्वागत करून त्यात सहभागी होणारेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!