गोव्यात शिवसेना करणार क्रांती

गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामतांचा सरकारला इशारा

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पोर्तुगीजांच्या सत्तेतून गोवा मुक्त व्हावा यासाठी असंख्य कार्यकर्ते भूमिगत पद्धतीने आपलं काम करत होते. पण गोवा मुक्ती संग्रामाची पहिली ठिणगी पडली ती डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलिओ मिनेझिस यांनी पुढाकार घेतला तेव्हा. पोर्तुगीज शासनाकडून गोव्यातील जनतेच्या मूलभूत अधिकारांची होत असलेली पायमल्ली लोहिया यांनी अनुभवली आणि त्याचमुळे ते पेटून उठले. यामुळे गोव्यात क्रांती करून पोर्तुगीजांना गोव्यातील सेनेने हकलून लावलं आणि तीच क्रांती आता गोव्यात शिवसेना करणार आहे. आज १८ जून पासून गोव्यात एक राजकीय क्रांती करण्याचा शिवसेनेने निर्धार केला असून यासाठी गोव्यातील युवकांनी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश करावा आणि गोव्यात राजकीय क्रांतीसाठी सज्ज व्हावं, असं आवाहन गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत यांनी पत्रादेवी येथे हुतात्मा स्मारकावर बोलताना केलं.

हेही वाचाः लोकांचा आवाज दडपण्यासाठीच एनएसए कायदा लागू केला

स्वातंत्र्य सैनिकांना केलं अभिवादन

गोवा राज्य शिवसेनेच्या वतीने १८ जून रोजी गोवा क्रांती दिनाचं औचित्य साधून ज्यांनी गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, अशा शूर वीरांच्या स्मृतीस्थळी पत्रादेवी येथे भेट देऊन पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली. यावेळी गोवा राज्य शिवसेना प्रमुख जितेश कामत, गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर, उत्तर गोवा जिल्हा प्रमुख सुशांत पावस्कर, गोवा राज्य सरचिटणीस मिलिंद गावस, बार्देश तालुका प्रमुख व्हिन्सेन परेर, मंदार पार्सेकर, पेडणे तालुका प्रमुख बाबली नाईक, विलास मळीक, दिवाकर जाधव, समीर पवार, कृष्णा आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रादेवी येथील स्मारकावर पुष्प  अर्पण करून स्वतंत्र सैनिकांना मानवंदना देण्यात आली.

हेही वाचाः CRIME | आरोपी विश्रांती गावसला सशर्त जामीन मंजूर

शिवसेना गोव्यात करणार क्रांती

गोव्याच्या राजकारणात जे प्रस्थापित राजकारणी आहेत ते सध्या क्रांतीची भाषा करत आहेत. ती भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही. सरकारात असताना सरकार विरोधात ही व्यक्ती ब्र काढत नव्हती. आता मात्र त्यांना क्रांती सुचत असून त्यांना आता त्यांची राजकीय जागा दाखवायला हवी. मात्र गोव्यात आता राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली आहे. आजपासून गोव्यात राजकीय क्रांती घडवून आणण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. या शिवसेनेच्या कार्याला गोव्यातील युवा पिढीने मोठ्या संख्येने सहकार्य करावं, असं आवाहन जितेश कामत यांनी केलं.

हेही वाचाः म्हापसा पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

गोव्यातही राजकीय क्रांती होणारः सुभाष केरकर

गोव्यात १९४६ मध्ये क्रांती झाली म्हणून आज गोवा मुक्त झाला. या क्रांतीचे प्रणेते डॉक्टर राम मनोहर लोहिया आहेत. या आंदोलनात गोवा मुक्ती संग्रामाच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. क्रांती केल्यानेच चळवळ यशस्वी होते आणि तेच काम आता गोव्यात शिवसेना करणार आहे. यासाठी गोव्यातील जनतेने सहकार्य करावं, असे आवाहन गोवा राज्य शिवसेना उपप्रमुख सुभाष केरकर यांनी केलं.

हेही वाचाः पेडणे पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

सरकारकडून गोव्यातील जनतेची अवहेलना

गोव्याच्या भाजप सरकारने गोव्यातील जनतेची अवहेलना चालवली आहे. त्याबद्दल आता खऱ्या अर्थाने क्रांतीची गरज आहे. ही क्रांती आता भाजपच्या विरोधात गोव्यात शिवसेना करणार आहे. त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावं आणि शिवसेनेला सहकार्य करावं, असं आवाहन पेडणे तालुका शिवसेना प्रमुख बाबली नाईक म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE | कोविड पॉझिटिव्हीटी दर घटला

गोव्याला खऱ्या क्रांतीची गरज

अनेक राजकर्ते आता क्रांतीची भाषा करत आहेत. ही त्यांची वेगळी क्रांती गोव्यातील जनतेला माहीत आहे. गोव्यात खऱ्या क्रांतीची गरज आहे. सरकारात राहिल्यानंतर क्रांती सुचत नाही. मात्र बाहेर पडल्यानंतर क्रांतीची भाषा येते आणि त्याबाबत आता शिवसेना त्याविरुद्ध आवाज उठवणार आहे. गोव्यातील शिवसेनेला क्रांती करण्यासाठी जनतेने सहकार्य करावं, असे आवाहन गोवा राज्य शिवसेना सरचिटणीस मिलिंद गावस यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!