मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवलाय

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; मगोच्या सुदीन ढवळीकर आणि दीपक ढवळीकरांना दिल्या कानपिचक्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. तर मगोच्या सुदीन ढवळीकर आणि दीपक ढवळीकरांनाही कानपिचक्या दिल्यात.

मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवलाय

काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोममंतक पक्ष हे गोव्याच्या मातीतले मूळ पक्ष. पण भाऊसाहेब बांदोडकरांसारखा नेता राहिला नाही आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षाचं अस्तित्वही उरलं नाही. मगो पक्ष भाजपने गिळून ढेकर देऊन पचवलाय. याला जबाबदार मगोचं सध्याचं नेतृत्त्वच आहे. गोव्यातील लोकांना भाजप हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे, अशी टीका अग्रलेखातून करण्यात आलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!