फालेरोंचा मोठा विनोद

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; फालेरोंची उडवली खिल्ली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. त्याचबरोबर सोमवारी अचानक काँग्रेसच्या आमदारकीसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले लुईझिन फालेरो हे मोठा विनोद आहेत असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेनं त्यांची खिल्ली उडवलीये.

फालेरोंचा मोठा विनोद

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. फालेरो हे प. बंगाल निवासी तृणमूल काँग्रेसमध्ये निघाले असल्याचं समजतं. फालेरो सांगतात, मी नावेलीमधील आपल्या समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेतला. हा मोठाच विनोद आहे. मतदारांना गृहीत धरून नेता परस्पर निर्णय घेतो आणि जनतेची फरफट सुरू होते. गोव्यात गेली काही वर्षं जनतेची अशीच फरफट सुरू आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

काँग्रेसचा राजीनामा दिला असला, तरीही काँग्रेस कुटुंबासोबतच

तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्यापासून सातत्याने लुईझिन फालेरो यांचं नाव चर्चेत होतं. लुईझिन यांनी मात्र आपण ‘आयपॅक’शी चर्चा केली, पण तृणमूलच्या संपर्कात नसल्याचं सांगत या विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सभापतींकडे आमदारकीचा राजीनामाही सादर केला. शिवाय पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार असल्यानं ते तृणमूलमधील प्रवेशासंदर्भात घोषणा करतील असा अंदाज सर्वांनी बांधला होता; पण पत्रकार परिषदेतही त्यांनी तृणमूलच्या विषयाला फाटा देत आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असला, तरीही काँग्रेस कुटुंबासोबतच असल्याचं स्पष्ट केलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!