निवडणूक मोसमात गोव्यात या, निखळ मनोरंजनाचा आनंद घ्या

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; गोव्यातील राजकरणावर केली सडकून टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. तर निवडणूक मोसमात गोव्यात या, निखळ मनोरंजनाचा आनंद घ्या, असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेनं गोव्यातील राजकारणावर निशाणा साधलाय.

गोव्यात सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन

गोव्यात पर्यटक खूप येतात. सध्या धावत्या पर्यटनाची एक नवी फॅशन निघाली आहे. गोवा आकाराने लहान आहे. म्हणून एका दिवसात गोवा पाहून अनेक लोक परत जातात. काही लोक गोव्यात खास करमणूक नाही, दोन दिवसांतच कंटाळा आला, असं सांगून परत जातात. त्या सर्वांनी निवडणूक मोसमात गोव्यात यायला हवं आणि मनोरंजनाचा आनंद घ्यायला हवा असं वातावरण सध्या निर्माण झालं आहे.

पण त्यामागे ‘सत्ता’ हेच एकमेव सूत्र आहे

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. त्यामुळे राजकीय पर्यटनाचा ओघ वाढला आहे. बेडूकही ‘डराव डराव’ करु लागले आहेत आणि इकडून तिकडे उड्या मारू लागले आहेत. हे सर्व बेडूक उड्या मारताना राजकीय तत्त्वे, नीतिमत्ता याबाबत डराव डराव करतात, पण त्यामागे ‘सत्ता’ हेच एकमेव सूत्र आहे, अशी टीका अग्रलेखातून गोव्याच्या राजकारणावर करण्यात आलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!