राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय?

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; गोव्यातील राजकारण्यांवर उपस्थित केले प्रश्न

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. तसंच राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? असा सवालही सामना अग्रलेखातून शिवसेनेनं उपस्थित केलाय.

राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय?

आता मुख्यमंत्री सावंत सांगतात, गोव्यातील प्रत्येक गाव म्हणे स्वयंपूर्ण करणार. तरुणांना अमली पदार्थांचे व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसे काय बनविणार ते सांगा. गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेले नाही व कलंगुट समुद्रकिनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले. राजकारण्यांना गोव्याच्या खऱ्या प्रश्नांची जाण उरली आहे काय? गोव्याच्या राजकारणात कोण कोठे जाईल व कोणाच्या गळास कोणता मासा लागेल याचा भरवसा नाही.

गोव्यातील लोकांना भाजप हा हिंदूंचा तारणहार असा पक्ष वाटत असेल तर ते चूक आहे, असं म्हणत शिवसेनेंनं भाजपवर तिखट शब्दांत टीका केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!