गोव्याचे कारभारी इस्टेटी घेण्यात मश्गूल

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; गोव्याचे कारभारी इस्टेटी घेण्यात मश्गूल म्हणत केली सडकून टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोवा सरकारातील मंत्री तसंच त्यांचे कारभारी इस्टेटी घेण्यात मश्गूल असल्याचं म्हणत सडकून टीका केलीये.

गोव्याचे कारभारी इस्टेटी घेण्यात मश्गूल

सरकारातले मंत्री व त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्त इस्टेटी विकत घेण्यात मशगूल आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!