गोव्यात भाजपचा आकडा फुगला, हे नैतिकतेचे राजकारण नाही

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. गोव्यात भाजपचा आकडा फुगला, हे नैतिकतेचे राजकारण नाही असं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेनं गोव्यातील भाजप सरकारव निशाणा साधलाय.

भाजपचा आकडा फुगला, हे काही नैतिकतेचं राजकारण नाही

भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे तो स्वतःच्या ताकदीवर नाही. मागच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप अल्पमतात होता. काँग्रेस पक्षाने सर्वाधिक 17 आमदार जिंकूनही सत्ता स्थापनेच्या दाव्यास उशीर केला. या काळात भाजपने फोडाफोड करून बहुमत विकत घेतलं. हे सर्व काय आणि कसं घडलं हे गोंयकारांना समजलं आहे. गोव्यात 17 आमदारांवरून काँग्रेस पक्ष चारवर आला. भाजपचा आकडा फुगला. हे काही नैतिकतेचं राजकारण नाही.

गोव्यात भाजप सरकारविरोधात मोठा संताप

भाजपने स्वबळावर 20-25 जागा जिंकून सत्ता मिळवली असती तर त्यांची पाठ थोपटता आली असती, पण गोव्यात तसं काहीच झालं नाही. भारतीय जनता पक्षाच्या सध्याच्या सरकारविरुद्ध लोकांत प्रचंड संताप आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!