भाजप ही गोव्यातली खरी बीफ पार्टी!

शिवसेनेचा मुखपत्रातील अग्रलेखातून हल्लाबोल; गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः शिवसेना खासदार हे बुधवारपासून गोवा दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शिवसेनेनं आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून गोव्यातील भाजप सरकारवर सडकून टीका केलीये. गोव्यात थापेबाजी सुरु असल्याचं म्हणत सामना अग्रलेखातून शिवसेनेनं गोव्यावर निशाणा साधलाय.

गोव्यातील थापेबाजी!

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आता ‘सरकार तुमच्या दारी’ हा उपक्रम साजरा करीत आहेत. त्या उपक्रमात ते जी थापेबाजी करीत आहेत, त्या थापेबाजीवर एखाद्याला प्रबंध लिहून डॉक्टरेट मिळवता येईल. गोव्यात निवडणुका आल्या की नवे पक्ष, नव्या आघाड्या निर्माण होतात. स्वतःचे दोनेक आमदार निवडून आणतात आणि जे सरकार येईल, त्यांच्यात सामील होऊन स्वतःचं उखळ पांढरे करून घेतात. यात गोव्याचं नुकसानच झालं आहे. गोव्यातील उद्याच्या निवडणुकांत तरी हे चित्र बदलावं. अल्बुकर्कने गोवा जिंकला आणि 450 वर्षे पोर्तुगीजांच्या सत्तेखाली ठेवला. गोव्याचं राजकीय डबकं करणारे आजचे राजकारणी पोर्तुगीज सत्तेचेच वारसदार आहेत. गोव्यातील थापेबाजीचा अंत व्हावा असं कुणालाच का वाटू नये? असं अग्रलेखात म्हटलंय.

सरकारमधले मंत्री आणि त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्ट इस्टेटी विकत घेण्यात मशगूल

भाजप सरकारविरुद्ध लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. कोविड काळात तर सरकारनं स्वतःलाच मृत घोषित केल्यानं गावागावंत कोरोनानं कहर केला आणि त्यात लोकांचे बळी गेले. गोव्यातील आरोग्य व्यवस्थ साफ कोलमडून पडली आहे. सरकारमधले मंत्री आणि त्यांचे कारभारी हे गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकात फक्ट इस्टेटी विकत घेण्यात मशगूल आहे. तरुणांना अमली पदार्थांचं व्यसन लावून, जुगाराची चटक लावून तुम्ही गोव्याला स्वयंपूर्ण कसं काय बनवणार ते सांगा? गोव्यातील मुली सुरक्षित नाहीत. सिद्धी नाईक प्रकरण संपलेलं नाही आणि कळंगुट समुद्रनाऱ्यावर ज्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला, त्यातून अनेक प्रश्न निर्माण झालेत, असं अग्रलेखात म्हटलंय.

भाजप ही गोव्यातली खरी बीफ पार्टी

भाजप ही गोव्यातली खरी बीफ पार्टी असून हिंदुत्व हा फक्त मुखवटा आहे. देशात गोवंशहत्य बंदी कायदा लागू आहे, पण गोव्यात हवं तितकं बीफ म्हणजे गोमांस मिळत आहे. हे ढोंग नाही तर काय? पंतप्रधान मोदी यांना जुगाराचा राग आहे, गोव्याच्या समुद्रातील कॅसिनो जुगाराच्या बोटी मंत्र्यांचे खिसे भरत आहेत, असं म्हणत शिवसेनेंनं भाजपवर तिखट शब्दांत टीका केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!