शिरदोन अर्भक प्रकरण : 18 बाळंतिणींचा पत्ताच लागेना, गुंतागुंत वाढली

पोलिसांकडून तपासाला वेग, गुन्ह्याबाबतचं गूढ आणखीन वाढलं

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : शिरदोन परिसरात 25 सप्टेंबर रोजी एक महिन्याच्या अर्भकाचे अवयव सापडल्यानं एकच खळबळ माजलीय. या प्रकरणी आगशी पोलिसांनी राज्यातील पंचायतींना, हॉस्पिटल्स तसंच अंगणवाडींना पत्रव्यवहार करून प्रसुती झालेल्या मातेबाबत माहिती मागवण्यास सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे सुमारे 18 जणींचा पत्ता सापडत नसल्याचं गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळे घरी प्रसूती झालेल्या मातेबाबत काही कळल्यास माहिती देण्याचे आव्हान राज्यातील पंचांना केलंय.

काय आहे प्रकरण?

आगशी पोलिस स्थानकाच्या शिरदोन किनाऱ्याजवळ शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी सकाळी एका अर्भकाचे अवयव असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करून अर्भकाचे अवयव ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 318 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढीत चौकशी सुरु आहे. तसंच बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात अर्भकाची शवचिकित्सा करण्यात आली. यावेळी संबंधित अर्भक एका महिन्याचे असल्याचे माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली.

पत्ता नसल्यानं गुंतागुंत वाढली

या माहितीवरून पोलिसांनी राज्यातील आरोग्य केंद्र, हॉस्पिटल्स तसंच अंगणवाडीकडे मागील एका महिन्यात प्रसूती झालेल्या मातेची माहिती मागितली होती. या माहितीची तपासणी सुरु असून आतापर्यंत 18 बाळंतीण झालेल्यांचा पत्ता योग्य नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे पोलिसांनी राज्यातील पंचायतीकडून माहिती मागितली आहे. शिवाय पंचायत परिसरात प्रसूती झालेल्या मातांचीही माहिती मागवली आहे. याप्रकरणी आगशी स्थानकाचे पोलिस निरीक्षक विजय राणे सरदेसाई याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंदार परब पुढील तपास करित आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!