केपेत शिकारीचा नाद जीवावर बेतला!

पोलिसांकडून पुढील तपास सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपे : झळेरान – मायणा येथे शिकारीसाठी गेलेल्या दोघापैकी एकाला बंदुकीची गोळी लागली. यात कोंन्डीर रीवण येथील वासू फटी गावकर (४२) याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी गावकर याचा साथीदार दत्तप्रसाद पडीयार (झळेरान -मायणा) याला केपे पोलिसानी अटक केली आहे.
केपे पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ६. ४५ वाजता नेहमीप्रमाणे गावकर आणि पडीयार शिकारीसाठी गेले होते. या वेळी त्यानीच तयार केलेल्या बंदुकीची गोळी लागल्यामुळे गावकर याच्या घटनास्थळी मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी गावकर याचा साथीदार दत्तप्रसाद पडीयार याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ r/w ३४ आणि शस्त्र कायद्याचे कलम २५ नुसार गुन्हा दाखल करून रीतसर अटक केली आहे. दरम्यान मृत्यू झालेल्या गावकर याच्यावर गुरुवारी शवचिकित्सा करून मृतदेह कुठुबीयाच्या स्वाधीन करण्यात आला आहे. या प्रकरणी केपे पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक दिपक पेडणेकर पुढील तपास करीत आहे. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!