शेळ-मेळावलीवासी सतर्क
म्हावशीतील ग्रामस्थांचा मेळावलीवासीयांना पाठिंबा.

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः मागचे काही दिवस आयआयटी प्रकल्पामुळे शेळ-मेळावली पेटून उठलेय. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी मेळावलीवासियांनी मोर्चा काढलाय. यावेळी रागाने पेटून उठलेल्या मेळावलीवासीयांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. पण पोलिसांनादेखील न जुमानता मेळावलीवासियांनी मोर्चा कायम ठेवला. मेळावलीवासियांचा आयआयटी प्रकल्पाला विरोध असूनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आयआयटी प्रकल्प मेळावलीतच होणार याबद्दल ठाम आहेत. या संदर्भात आयआयटी जागेसाठी मेळावलीत आजही सीमांकन होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थ सतर्क झालेत आणि शेळ मेळावलीत तणावपूर्ण शांतता दिसतेय. मेळावलीवसीयांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावातील लोक तसंच संघटना पुढे आल्यात.
म्हावशीतील ग्रामस्थांचा मेळावलीवासीयांना पाठिंबा
मेळावलीवासियांनी पोलिसांवर दंडुके, कोयते, मिरची पुडीचे पाणी वापरून हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मेळावलीवासीयांनी गंभीर गुन्हे दाखल केलेत. यानंतर मेळावलीवासीयांनी गोमंतकीयांकडे मदतीसाठी आवाहन केलं होतं. गोव्यातील बर्याच संस्थांनी मेळावलीवासीयांना पाठिंबाही दर्शवलाय. आयआयटी जागेसाठी मेळावलीत आजही सीमांकन होणार असल्याने मेळावसीवासीयांना पाठिंबा देण्यासाठी म्हावशीतील ग्रामस्थ मोठ्या संखेने मेळावलीच्या दिशेने रवाना झालेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणालेत,
शेळ – मेळावलीत आयआयटी जागेसाठी आज पुन्हा सीमांकन सुरू होईल. अडथळ्यांमुळे दोन दिवस हे काम बंद होतं, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार सीमांकन सुरू झालं, तर ग्रामस्थ त्याला प्राणपणाने विरोध करतील. यामुळे पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यात पुन्हा संघर्श निर्माण होण्याची शकता आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता आहे.
सरकार आणि ग्रामस्थ आपापल्या भुमिकांवर ठाम
शेळ-मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आवाहन करूनही ग्रामस्थांनी काहीच प्रतिसाद दिली नाहीये. सरकार आणि ग्रामस्थ आपापल्या भुमिकांवर ठाम आहेत. दोघांपैकी एकही जण मागे हटण्यासाठी तयार नाही. त्यामुळे हा प्रश्न सुटण्याऐवजी अजून चिघळतोय. दोघांपैकी एकाने जरी एक पाऊल पुढे टाकले, तरी हा प्रश्न सुटू शकले.