कुंकळये-म्हार्दोळ येथे वैशिष्टपूर्ण रथोत्सव साजरा

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हार्दोळ: कार्तिक पौर्णीमा झाली की पाच दिवसाच्या फरकांनी अंत्रूज महालातील गावागावात देवींच्या काले व जत्राना सुरवात होते. यात शांतादुर्गा, सातेरी व नवदुर्गा आदी देवींच्या देवळानी होणारा वैशिष्टपूर्ण दिवजोतस्तव व रथोत्सव हे या जत्रेचे शेकडो वर्षांचे वारसा रूपी आकर्षण होय.
या परिसरातील, जास्त करून सातेरी व शांतादुर्गा देवींच्या मंदिराचे वैशिष्टे हे, की येथल्या गाभाऱ्यात देवी मूर्तीच्या मागे वारूळ आहे. काहीकडे तर या वारूळांची उंची चक्क दहा बारा फूटा पर्यंत आहे. आदीशक्तीची ही आदिस्थळे आहेत हे सांगण्यास वेगळा पुरावा नको. ज्या मंदिराची अजूनही जुनी कौलारू शिखरे आहेत, ती सुद्धा वारुळाच्या प्रतीकृतीचीच आहे.
इतकच नव्हे तर जत्रेच्या दिवशी ग्रामस्त भाविकांकडून दंडावर ठेवून नाचविला जाणारा रथ, हा देखील याचं वारूळाची प्रतिकृती असतो. आज चित्ररथाचे अप्रूप आहे पण आपल्या पारंपरिक सुताराने (च्यारी-मेस्त) शेकडो वर्षांपूर्वी वारूळात आसनस्थ असलेल्या देवीना उत्सवानिमित्त बाहेर नेताना सुद्धा त्या वारुळाचाच “चित्ररथ” केला.ज्याला आपण जत्रेचा रथ म्हणतो. या रथाचे वजन पन्नास मण (म्हणजे किलोच्या हिशोबाने जवळ जवळ पाऊण एक टन ) असावे असे मानले जाते. आता हे रथ त्या मानाने कमी वजनाचे असतात. गावकऱ्याच्या एकी पुढें हा कितीही जड़ रथ फुलासारखा हलका वाटतो.

आज कोवीडमुळे उत्साहावर विरजण आली आहे हे असले तरी पण गावकऱ्याच्या एकीपुढे या कोविड अवाक झाला असेल. आमच्या (कुंकळये म्हार्दोळ) देवी शांतादुर्गेची रविवारी जत्रा व सोमवारी रथोत्सव झाला.भाविकांनी परिस्थीची जाणीव व जबाबदारी घेऊन आपल्या देवीच्या उत्सवात सहभागी झाले.