महिला घुमट आरती स्पर्धेत शांतादुर्गा बोडगेश्वर मंडळ प्रथम…

स्पर्धेतील दुसरे बक्षीस श्री लईराई महिला घुमट आरती मंडळाला

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : खोर्ली-म्हापसा येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पणजी सम्राट क्लबच्या सहाय्याने आयोजित निमंत्रितांच्या महिला घुमट आरती स्पर्धेत श्री शांतादुर्गा बोडगेश्वर घुमट आरती मंडळाला पहिले बक्षीस प्राप्त झाले. स्पर्धेतील दुसरे बक्षीस श्री लईराई महिला घुमट आरती मंडळ, तिसरे युवा कला मोगी तळावली-फोंडा यांना बक्षिसे मिळाली. तर उत्तेजनार्थ बक्षीस श्री सातेरी महिला घुमट आरती मंडळ, पोडवाळ-खोर्जुवे यांना प्राप्त झाले.
हेही वाचा:गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पात ‘स्फोट’, मोलायसिसचा पाईप ‘फुटला’…

मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान

वैयक्तिक बक्षिसांत उत्कृष्ट गायक म्हणून श्री लईराई महिला घुमट आरती मंडळ, उत्कृष्ट कसाळ वादक श्री सातेरी महिला घुमट आरती मंडळ, उत्कृष्ट समेळ वादक युवा कला मोगी तळावली-फोंडा, उत्कृष्ट घुमट वादन श्री शांतादुर्गा बोडगेश्वर घुमट आरती मंडळ व उत्कृष्ट शिस्तबद्ध पथक म्हणून श्री सातेरी महिला घुमट आरती मंडळ, पोडवाळ-खोर्जुवे यांना पारितोषिके मिळाली.
समाजसेविक निलिमा सूरज मोरजकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी पणजी सम्राट क्लबच्या अध्यक्षा प्रेरणा पावसकर, पांडुरंग वराडकर, रोहिदास नाईक, दत्ताराम नार्वेकर उपस्थित होते. स्पर्धेचे परिक्षण सुशांत साळगावकर व सतीश कुडणेकर यांनी केले. 
हेही वाचा:Neeraj Chopra : नीरजने पुन्हा घडवला इतिहास…

    

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!