लज्जास्पद! लिफ्टमध्ये दोन सख्ख्या बहिणींचा विनयभंग, जिल्हा रुग्णालयातील प्रकार

पोलिसांत तक्रार दाखल, अधिक तपास सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : काही दिवसांपूर्वी म्हापशात एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक खळबळजनक प्रकार म्हापशातूनच समोर आला आहे. लिफ्टमध्ये दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा विनयभंग केल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा देखील नोंदवलाय.

नेमकं काय घडलंय?

म्हापसा जिल्हा इस्पितळातील लिफ्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय. दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणी रुग्णालयाच्या लिफ्टमधून जात होत्या. त्यावेळी इस्पितळातील कर्मचारी असलेल्या एकानं या दोघींचाही विनयभंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गोविंद सावंत याला अटक केली आहे. संशयित आरोपी गोविंद हा पर्ये, सत्तरी येथील राहणारा आहे.

Raped by father kalyan 800 450

वॉर्ड बॉय असलेल्या गोविंद सावंत याच्यावर पीडित मुलींनी गंभीर आरोप केलेत. लिफ्टमध्ये असताना गैरफायदा उचलत वॉर्ड बॉयनं अश्लिल संभाषण करत दोन सख्ख्या बहिणींचा विनयभंग केला. या मुलींचं वय 17 आणि 13 वर्ष असून त्या आपल्या जखमी आईच्या उपचारासाठी रुग्णलायात गेलेल्या होत्या. दरम्यान, आईच्या शिफ्टींगच्या वेळी लिफ्टमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं पीडित मुलींनी तक्रारीत म्हटलंय.

कधीची घटना?

23 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास 3 वाजता तर 25 सप्टेंबरला सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. लिफ्टमध्येच वॉर्डबॉयनं अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला ताब्यातही घेतलंय. दरम्यान, संशयित आरोपी असलेल्या वॉर्डबॉय गोविंदवर कलम 354, 354 अ, 354-ड, त्याचप्रमाणे पॉक्सो कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!