तरंगत्या जेटीवरून मच्छिमार बांधवांची सेवा की राजकीय स्वार्थ?

मांद्रेचे युवा वकील अमित सावंत यांचा सवाल

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः 2022ची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून मांद्रे मतदारसंघातील इच्छुक मंडळी एकही विषय सोडत नाहीत. शापोरा नदीत तरंगत्या जेटी संदर्भात शिवोली गावातली नागरिकांनी विरोध दर्शवल्यानंतर सदर जेटीचं स्थलांतर आगरवाडा-चोपडेच्या बाजूस केल्यानंतर मांद्रे मतदारसंघातील विधानसभा इच्छुक मंडळींनी आमदार दयानंद सोपटेंसहीत विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्याच बरोबर आमदार महोदयांनी तर लोक विरोधी प्रकल्पाला आपण मतदारसंघात थारा देणार नाही, असं जाहीर केलं आणि सदर जेटी तर केंद्र सरकार शासित सागरमाला प्रकल्पाचा एक भाग आहे. पण त्यास स्थानिक ग्रामस्थांचा विरोध असल्याकारणाने आपलाही त्यास विरोध, असं स्पष्ट वक्तव्य प्रसारमाध्यमांसामोर केलं. याचाच अर्थ आमदार सोपटे यांच केंद्रातील भाजप आघाडी सरकार विरोधात वक्तव्य हे खरोखरच विरोधी की 2022 ची विधानसभा निवडणूक नजरेसमोर ठेवून केलेलं वक्तव्य आहे? असा दावा मांद्रेचे युवा वकील अमित सावंत यांनी केला आहे.

हेही वाचाः डिचोली सेसा कामगारांनी घेतली सभापतींची भेट

अगोदर पडताळणी करावी आणि नंतर त्यावर भाष्य करावं

आमदार तथा स्थानिक सोडून जी मंडळी सदर जेटीला आपला विरोध आणि आंदोलन उभारू अशी वक्तव्य करतात, त्यांनी अगोदर खरोखरच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण याअगोदर याच शापोर नदीत तरंगती खाजगी जहाज आणून उभी केली होती, ती कुणाच्या आशीर्वादानं? त्यातील एक जहाज तर नंतर मांडवी नदीत स्तलांतरित करून त्यावर रेस्टॉरंट उभारण्यात आलं, ज्याचं उद्घाटनसुद्धा मगोचे तत्कालीन मंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते करण्यात आलं ते एक नवलच. इच्छूक व्यक्तिमत्त्वांनी प्रसार माध्यमांशी केलेल्या वक्तव्यानुसार पर्यावरण पूरक गोष्टी सोडून विद्यमान सरकार पर्यावरण विरोधी गोष्टींना प्राधान्य देत आहे, तर मग बिगर गोमंतकीय नागरिकांना डोंगर कापणी करण्यास कोणी सहकार्य केलं, किंबहुना करत आहेत? मिठाचे आगर कोणी व कुणाच्या सहकार्याने उध्वस्त करण्यात आले याची अगोदर पडताळणी करावी आणि नंतर त्यावर भाष्य करावं, अशी मागणी एड. सावंत यांनी केली आहे.

हेही वाचाः डिचोली पालिका मंडळाची बैठक

या समाजाची सरकारने दखल घेतली नाही

मच्छिमार बांधवांचं खरोखरच हीत जपायचं असतं तर एव्हाना कितीतरी गोष्टी सदर समाजाला उपलब्ध करून देण्यास ही मंडळी या अगोदर पुढे सरसावली असती. हा विषय तर भयंकर मोठा आहे. कारण मूलभूत बाबींपासून सदैव दूर राहिलेला हा समाज, याची कुठल्याही सरकारने, किंबहुना राजकीय पुढाऱ्यांनी दखल घेतली नाही. केवळ फक्त राजकारण करण्यासाठी आणि सदर समाजाचा योग्य असा उपयोग करून घेण्यासाठी या समाजाचा फक्त वापर चाललेला दिसतोय.

हेही वाचाः ब्रेकिंग! केंद्र सरकारचा #Twitterला शेवटचा इशारा

यावर कधीच या मंडळींनी भाष्य का केलं नाही ?

सदर जेटी ही जर केंद्र सरकारच्या प्रकल्पाचा एक भाग आहे, तर त्याला विरोध हा केवळ एक राजकीय स्वार्थ. कारण नदी किंवा समुद्र यावर कुणीही आपला मालकी हक्क किंवा अधिकार प्रस्तापित करू शकत नाही. त्याचबरोबर नदी किनारी किमान 50 मीटरवर कुठल्याही प्रकारचा खाजगी प्रकल्प उभारला जाऊ शकत नाही याची सर्व विधानसभा इच्छुक मंडळींना कल्पना आहे. मग, शापोरा नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळ जे अवैध्य खाजगी प्रकल्प बांधलेले आहेत, त्याची झळ मत्स्यपालन तथा पारंपरिक पायवाटांचा ताबा सदर खाजगी प्रकल्प उभारून घेतला, यावर कधीच या मंडळींनी भाष्य केलं नाही…का? असा सवाल एड. सावंत यांनी उपस्थित केलाय.

हेही वाचाः आनंदवार्ता | मान्सूनचं आगमन, राज्यात ठिकठिकाणी रिमझिम सरी बरसायला सुरुवात

हे पण एक नवलच

थोडक्यात सांगायचं तात्पर्य एवढंच की ज्याक्षणी आपण मोपा विमानतळासारख्या प्रचंड आर्थिक गुंतवणूक जगविख्यात प्रकल्पाला सहकार्य दर्शवलं, त्याक्षणी आपण हा ही विचार केला पाहिजे, की सरकार पर्यटन दृष्टीने सर्व बाबींना चालना देणार आहे. कदाचित सागर माला प्रकल्पाद्वारे तरंगती जेटी हा ही त्याचा एक भाग असू शकतो. नदी किंवा समुद्र यावर सरकारी अधिकार असतो, त्याला आपण विरोध करतो. पण नदी किनारी काँक्रिट भिंत उभारताना कधी सामूहिक विरोध सोडाच, पण नको असलेले खाजगी प्रकल्प उभारून त्यांना नको ते व्यवसाय करण्यास चालना द्यायला अग्रेसर असलेली मंडळीं, आज सरकारी अख्यारीतात येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करताना दिसतात हे पण एक नवल.

हेही वाचाः डिचोली तालुक्यात 140 शेतकऱ्यांचं नुकसान

त्याला आपण विरोध कसा काय करू शकतो?

मान्य आहे नदी किनारी खाजगी जागा असते. पण तिथे जर सरकारी रस्ता किनाऱ्याला जोडलेला असेल, तर त्याला आपण विरोध कसा काय करू शकतो? तेरेखोल येथे गोल्फ कोर्स सारख्या प्रकल्प आणणाऱ्या आस्थापनाला सहकार्य करणाऱ्या मंडळीना हे माहीत नाही का, की तो प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नदीकिनारी खाजगी जहाज आणून उभी केली जातील?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!