मुंबईला जाणाऱ्या पावलो बसचा ओरोसजवळ गंभीर अपघात

पावसानं बस झाली पलटी ; दूध व्यवसायिकाचा चिरडून जागीच मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

सिंधुदुर्गनगरी : ओरोस येथे पावलो ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन झालेल्या अपघातात पायी चालत जाणारे दूध व्यवसायिक मंगेश महादेव सावंत, वय ४६, रा. सावंतवाडा हे जागीच ठार झाले. तर गाडीतून प्रवास करणारे दोघे गंभीर जखमी झाले तर अन्य काहींना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भवानी मंदिर, मुंबई-गोवा महामार्गावर घडला.

शोभा रवि वाघेला रा.म्हापसा व सोपान आशिष दुबे रा.अंधेरी अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा येथून ही बस मुंबईच्या दिशेने जात होती. ती ओरोस येथे आली असता रस्त्यावर पावसाचे पाणी असल्यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस पलटी होऊन पुन्हा गोव्याच्या दिशेने उलटी कोसळली. यावेळी त्या ठिकाणी दूध पोहचवण्यासाठी चालत जात असलेले मंगेश सावंत हे त्या बस खाली चिरडले गेले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!