नानोडातील अपघातात ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांचं निधन

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसा : नानोडा डिचोली येथील ज्येष्ठ ग्रामीण पत्रकार विशाल कळंगुटकर यांचे शनिवारी संध्याकाळी अपघाती निधन झालंय. नानोडा येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. मात्र अपघातानंतर जखमी झालेल्या कळंगुटकर यांना उपचारासाठी नेलं जात असताना वाटेतच त्यांनी प्राण सोडला.

कसा घडला अपघात?
हा अपघात संध्याकाळी ७ च्या सुमारास घडला. ते आपल्या दुचाकीवरून अस्नोडा मार्गे नानोडा येथे घरी जात होते. नानोडा येथील कारखान्याच्या त्यांच्या दुचाकीची ठोकर रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या बेवारस गुरांना बसली. या अपघातात ते जखमी झाले होता. त्यानंतर कळंगुटकर यांना रुग्णवाहिकेतून डिचोलीतील हॉस्पिटलमध्ये नेत असताना वाटेतच त्यांचं निधन झाले.
हेही वाचा – VIDEO | Accident | Sad | हृदयद्रावक! पहिल्या वाढदिवशीच चिमुकल्याचा मृत्यू
दुःखद!
या घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ज्येष्ठ पत्रकार विशाल कळंगुटकर यांच्या मागे पत्नी, दोन मुलं, एक मुलगी, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. त्यांच्या निधनावर गोवा श्रमिक पत्रकार संघटनेने दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी नानोडा येथील श्री शांतादुर्गा कळंगुटकरीन देवस्थानचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं.
हेही वाचा – गोवा फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू