पोलिस शिपाई पदासाठीच्या निवड चाचणी १६ जुलै पासून पाच ठिकाणी सुरू

पोलीस खात्याकडून पोलीस अधीक्षकाच्या नेत्तृत्वाखाली वेगवेगळे निवड चाचणी मंडळे स्थापन

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: गोवा पोलिस खात्याने २८ मार्च २०२१ रोजी जाहिरात देऊन १०९७ विविध पदांसाठी इच्छुकांकडून अर्ज मागितले होते. यातील पोलिस शिपाई पदासाठीच्या निवड चाचणी १६ जुलै पासून पाच ठिकाणी सुरू होणार आहे. यासाठी पोलीस खात्याने पोलीस अधीक्षकाच्या नेत्तृत्वाखाली वेगवेगळे निवड चाचणी मंडळे स्थापन केले आहे. याबाबतचा निर्देश मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांनी जारी केला आहे.

हेही वाचाः गोवा राज्य कमर्शिअल लॉगिस्टिक्स हब व्हावं यासाठी पाऊल उचलणार

१६ जुलै पासून निवड चाचणी

गोवा पोलिस खात्याने २८ मार्च २०२१ रोजी जाहिरात देऊन १०९७ विविध पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. यात पोलिस शिपाईचे ९१३ पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी अर्ज केलेल्याची १६ जुलै पासून निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस खात्याने पुरूष उमेदवारासाठी पर्वरी येथील गोवा क्रिकेट संघटनाचे मैदान, वाळपई येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र, फार्मागुडी – फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालय आणि फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमच्या बाहेर खुल्या मैदानावर तर महिला उमेदवारासाठी आल्तिनो – पणजी येथील गोवा राखीव पोलीस कॅम्पमध्ये निवडी चाचणी घेण्यात येणार आहे.

हेही वाचाः मांद्रेत मनोरंजन पार्क म्हणजे पर्यावरणाची हानीच

निवड चाचणी मंडळे स्थापन

यासाठी खात्याने निवड चाचणी वेळी काही समस्या असल्यास त्याचं निवारण करण्यासाठी मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक अभिषेक धानिया यांच्या नेत्तृत्वाखाली अपील मंडळ स्थापन केलं आहे. यात उपअधीक्षक संतोष देसाई, पोलीस निरीक्षक नेर्लोन आल्बुकेअर यांच्यासह इतर १० कर्मचारीचा समावेश करण्यात आला आहेत.

हेही वाचाः कोरोना आकडेवारी! मृत्यू पुन्हा वाढले, 7 रुग्ण दगावले

पर्वरीतील निवड चाचणी मंडळ

पर्वरी येथे पुरुष उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक सेराफीन डायस याच्या नेत्तृत्वाखाली वगवेगळे तीन मंडळ स्थापन केली आहेत. उंची मोजण्यासाठी मंडळात उपअधीक्षक सलीम शेख, पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. छातीचे माप घेण्यासाठी मंडळात एडवीन कुलासो, पोलीस निरीक्षक विद्येश शिरोडकर यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसाशकीय सेवेसाठी मंडळात उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचाः गोंयकारांची मतं विक्रीसाठी नाहीत; भाजप-काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे

वाळपईतील निवड चाचणी मंडळ

वाळपई येथे पुरुष उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या नेत्तृत्वाखाली वगवेगळी तीन मंडळे स्थापन केली आहेत. उंची मोजण्यासाठी मंडळात उपअधीक्षक संदेश चोडणकर, पोलीस निरीक्षक राया नाईक यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहेत. छातीचे माप घेण्यासाठी मंडळात उपअधीक्षक गुरुदास गावडे, पोलीस निरीक्षक फिलोमेना कोस्टा यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहेत. प्रसाशकीय सेवेसाठी मंडळात उपअधीक्षक उदय परब, पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहेत.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघातून सचिन परब यांच्या दावेदारीला मांद्रे गट काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

फोंड्यातील निवड चाचणी मंडळ

फोंडा येथे पुरुष उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक सॅमी तावारीस यांच्या नेत्तृत्वाखाली वगवेगळी तीन मंडळ स्थापन केली आहेत. उंची मोजण्यासाठी मंडळात उपअधीक्षक धर्मेश आंगले, पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर आणि राजाशद शेख यांच्यासह इतर ९ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. छातीचे माप घेण्यासाठी मंडळात पोलीस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर, पोलीस निरीक्षक अर्जुन सांगोडकर यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसाशकीय सेवेसाठी मंडळात उपअधीक्षक नेल्सन आलब्युकेअर, पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचाः बिगर गोमंतकीयांसाठी सरकारकडून खास लसीकरण मोहीम

फातोर्ड्यातील निवड चाचणी मंडळ

फातोर्डा येथे पुरुष उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक पंकजकुमार सिंग याच्या नेत्तृत्वाखाली वगवेगळे तीन मंडळ स्थापन केली आहेत. उंची मोजण्यासाठी मंडळात उपअधीक्षक हरीषचंद्र मडकईकर, पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर आणि परेश नाईक यांच्यासह इतर ०९ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहेत. छातीचे माप घेण्यासाठी मंडळात पोलीस उपअधीक्षक राजेंद्र राऊत देसाई, पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर आणि तुकाराम चव्हाण यांच्यासह इतर ०९ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसाशकीय सेवेसाठी मंडळात उपअधीक्षक किरण पोडवाल, पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचाः एंटरटेनमेंट सिटीसाठी जागा मिळते, मग कलाकारांच्या कला भवनसाठी जागा का नाही?

आल्तिनोतील निवड चाचणी मंडळ

आल्तिनो – पणजी येथे महिला उमेदवारासाठी पोलीस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्या नेत्तृत्वाखाली वगवेगळी तीन मंडळे स्थापन केली आहेत. उंची मोजण्यासाठी मंडळात उपअधीक्षक सुनिता सावंत, पोलीस निरीक्षक अनुष्का पै बीर आणि लोवलीन डायस यांच्यासह इतर ०९ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. छातीचं माप घेण्यासाठी मंडळात पोलीस उपअधीक्षक मारीया मोन्सेरात, पोलीस निरीक्षक नुतन वेरेंकर आणि रेश्मा शिरोडकर यांच्यासह इतर ०९ कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रसाशकीय सेवेसाठी मंडळात उपअधीक्षक एजिल्डा डिसोझा, पोलीस निरीक्षक सुदिक्षा नाईक यांच्यासह इतर १० कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!