पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठीची निवड चाचणी उद्यापासून सुरू

१३ ऑगस्टपर्यंत चालणार निवड चाचणी; पोलिस खात्याकडून अधिकृत आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोवा पोलिस खात्याच्या पुढं ढकलण्यात आलेल्या पोलिस कॉन्स्टेबल भरतीसाठीची निवड चाचणी उद्या म्हणजेच १६ जुलै पासून सुरू होणार आहे. ही निवड चाचणी १३ ऑगस्टपर्यंत चालणार आहे, असं पोलीस खात्याने प्रसिद्ध केलेल्या आदेशात स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः पुराच्या पाण्यात ‘बाईक स्टंट’ ; ग्रामस्थांनी वाचवला युवकांचा जीव !

शारिरीक चाचणीसाठी आवश्यक सूचना

ज्यांनी अर्ज केला आहे पण कॉल लेटर पोचले नसेल अशा सर्वांनी अर्जाच्या क्रमांकाप्रमाणे दिलेल्या तारखेला तालुक्याप्रमाणे दिलेल्या ठिकाणावर सकाळी 9 वाजता उपस्थित रहावं. तसंच सोबत येताना एडमिट कार्डसाठी एक अलीकडचा पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा, असं पोलिस खात्याकडून सांगण्यात आलं आहे. तसंच दिलेल्या तारखेला मेडिकल इमरजन्सी, परीक्षा किंवा इतर इमरजन्सीमुळे जर उमेदवाराला शारिरीक चाचणीसाठी उपस्थित राहणं शक्य होत नसेल, तर शारिरीक चाचणीसाठी दिवस बदलून घेण्यासाठी ते लेखी विनंती करू शकतात, असं पोलिस खात्याने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलंय.

या ठिकाणी होणार चाचणी

या निवड चाचणीसाठी ठिकाणं पूर्वीच निश्चित करण्यात आली आहेत. एकूण 4 ठिकाणी ही निवड चाचणी करण्यात येणार आहे. उत्तर गोव्यातील तिसवाडी, बार्देश आणि पेडणे तालुक्यातील उमेदवारांसाठी पर्वरी इथल्या क्रिकेट मैदानावर, डिचोली आणि सत्तरी तालुक्यातील उमेदवारांसाठी वाळपई येथील पोलिस ट्रेनिंग स्कूल ग्राऊंडवर, धारबांदोडा आणि फोंडा तालुक्यातील उमेदवारांसाठी फर्मागुडी फोंडा येथील गोवा इंजिनिअरिंग कॉलेज ग्राऊंडवर, तर दक्षिण गोव्यासाठी फातोर्डा इथल्या मैदानावर ही चाचणी घेण्यात येईल.

हेही वाचाः पुढील काही तास महत्त्वाचे, पावसाचा रेड अलर्ट जारी

पोलिस खातं सक्षम करण्यासाठी सरकारनं चांगली पावलं उचलली आहे. पोलिस स्टेशन उभारणं, साधनसामुग्री उभा करणं याबरोबरच रिक्त पदं भरण्याबाबतही कार्यवाही होणार आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Heavy Rain | Risky Bridge | ६ गावांमधील लोकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!